Sunetra Pawar : राजकारणात उलटफेर होणार? सुनेत्रा पवार यांचा तडकाफडकी शरद पवार यांना फोन
राज्यात सध्या विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण (Sunetra Pawar) चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंच्या अनेक जागांवर बंडखोरी झाल्यामुळे राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढली होती.

Sunetra Pawar : राज्यात सध्या विधानपरिषदेच्या एकूण १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण (Sunetra Pawar) चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंच्या अनेक जागांवर बंडखोरी झाल्यामुळे राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढली होती.
बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा (Sunetra Pawar) करावी लागत आहे. अनेक ठिकाणी नेत्यांनी थेट बंडखोरांशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू केले, ज्यामध्ये काही अंशी यशही आले आहे. महायुतीने यापूर्वीच रायगड आणि ठाणे येथील निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले होते.
सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना थेट फोन; राजकीय वर्तुळात खळबळ
एकीकडे ही सर्व धामधूम सुरू असतानाच, राज्याच्या राजकीय वर्तुळात एक मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना तडकाफडकी फोन कॉल केल्याची माहिती समोर आली आहे.
फोन कॉल करण्यामागचे मुख्य कारण
पुणे विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांनी थेट पुढाकार घेतला होता. महायुतीकडून ही जागा बिनविरोध करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी थेट शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केली.
शरद पवारांचा आदेश आणि श्रीकांत पाटलांची माघार
पुण्याच्या जागेसाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे रिंगणात होते. दोन्ही बाजूंनी तगडे उमेदवार असल्याने ही निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे होती.
परंतु, सुनेत्रा पवार यांच्या फोन कॉलनंतर राजकीय सूत्रे वेगाने हलली. सुनेत्रा पवार यांच्या विनंतीला मान देत, स्वत: शरद पवार यांनी त्यांचे उमेदवार श्रीकांत पाटील यांना फोन केला आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या या आदेशानंतर श्रीकांत पाटील यांनी तातडीने निवडणुकीतून माघार घेतली.
उमेदवार विक्रम काकडे यांनीही साधला संवाद
महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांनीदेखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वतः शरद पवार यांना फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली होती.
थोडक्यात काय तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि विक्रम काकडे यांनी केलेल्या थेट संपर्कामुळे आणि शरद पवारांनी दाखवलेल्या राजकीय समजूतदारपणामुळे पुणे विधानपरिषद मतदारसंघातील संभाव्य संघर्ष टळला आहे. परिणामी, रायगड आणि ठाण्यापाठोपाठ आता पुण्याची जागाही बिनविरोध झाली असून महायुतीला यात मोठे यश मिळाले आहे.






