भाजपच्या अध्यक्ष पदासाठी महाराष्ट्रातील बड्या नेत्याला संधी मिळणार? पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

BJP New President | भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून बड्या नेत्याचे नाव पुढे येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेपी नड्डा यांची जागा घेऊ शकतात, असे मानले जात आहे.
लोकसभेतील अपयशाची फडणवीसांनी घेतली जबाबदारी
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित विजय मिळाला नाही म्हणून फडणवीस यांनी सत्ताकेंद्रातून बाहेर पडून पक्षाचे काम करण्याची मागणी केली होती. यावेळी फडणवीस यांना राज्याचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची अपेक्षा होती. परंतू, केंद्रीय नेतृत्वाने एवढ्यात सत्ता सोडू नये, असे समजावत फडणवीस यांना त्यांची भूमिका मागे घेण्यास लावली होती. राज्यातलं सरकार चालवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. भाजप अध्यक्ष पदासाठी फडणवीसांचे नाव चर्चेत असल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. BJP New President |
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का आशीर्वाद सदा महाराष्ट्र के साथ रहा है और रहेगा ।
उनके साथ मुलाकात कर हर बार एक नई ऊर्जा मिलती है, उनका मार्गदर्शन प्राप्त होता है ।
आज सपरिवार मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी से सदिच्छा भेट करने का अवसर प्राप्त हुआ । पत्नी अमृता और बेटी दिविजा… pic.twitter.com/YkywcOdl6d— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2024
फडणवीसांच्या नावाची चर्चा का?
फडणवीस यांनी यापूर्वीही पक्ष संघटनेचे काम केले आहे. मुख्यमंत्री ते राज्यातील गेलेली सत्ता परत आणणे यामध्ये फडणवीस यांनी खेळलेल्या चाली यामुळे ते चर्चेत राहिले आहेत. यामुळे अध्यक्ष पदासाठी फडणवीस स्पर्धेत असलेल्या सर्व नेत्यांपेक्षा योग्य उमेदवार मानले जात आहेत. विशेष म्हणजे फडणवीसांचे शहा आणि मोदींसोबत चांगले संबंध असल्याचे मानले जाते.
फडणवीसांचे संघचालक मोहन भागवत यांच्याशीही चांगले संबंध आहेत. शिवाय फडणवीस संघााचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे आहेत. तसेच आरएसएस आणि भाजपत अध्यक्ष पदावरून मतभेद होते. मात्र फडणवीसांच्या नावावर दोन्ही गट सहमत होताना दिसत आहेत.. BJP New President |
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत
नागपूर आणि महाराष्ट्रातून यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत. फडणवीसांनीही पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली जात होती. यामुळे फडणवीसांना अध्यक्ष केले तर अनेक फायदे भाजप पक्ष श्रेष्ठींना दिसत आहेत.
फडणवीसांच्या विरोधात मराठा आंदोलकांमध्ये रोष आहे. लोकसभेला याच वातावरणामुळे फटका बसला होता. फडणवीसांनाच जर केंद्रात घेतले तर हा रोष कमी करता येऊ शकतो. फडणवीसांपूर्वी महाराष्ट्रातूनच विनोद तावडेंचे नाव चर्चेत आले होते. यानंतर सुनील बन्सल यांचेही नाव चर्चेत आले होते. या सर्वांमध्ये फडणवीसांचे नाव सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे. BJP New President |
हेही वाचा:
शेअर बाजाराची सुरुवात संथ ; सेन्सेक्स-निफ्टी सपाट उघडले पण मिडकॅप-स्मॉलकॅप वधारले





