“पत्नीचा पाय फ्रॅक्चर, 50 हजार रुपयांचं तिकिट घेऊनही…”; अभिनेता वीर दासने एयर इंडियावर व्यक्त केली नाराजी

Veer Das Post | कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास याने एयर इंडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. वीर दासची पत्नी शिवानी माथुरला विमानानं प्रवास करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. शिवानीचा पाय फ्रॅक्चर झाला असताना तिला एयर इंडियाकडून मिळालेल्या वागणुकीमुळे वीर दासने नाराजी व्यक्त केली आहे.
वीर दासनं शेअर केलेल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं की ‘डियर एयर इंडिया, माझं म्हणणं आहे की तुमच्याकडे सगळ्यात चांगला केबिन क्रू आहे. ही पोस्ट लिहिताना मला फार वाईट वाटतंय. माझी पत्नी आणि मी व्हीलचेअर बूक केली होती. कारण तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. आम्ही दिल्लीसाठी टेक ऑफ करत होतो. एका सीटसाठी 50 हजार आम्ही दिले होते. मोडलेलं फूट रेस्ट आणि सीट देखील वाकडी होती. Veer Das Post |
सीट पूर्णपणे सरळंही होऊ शकत नव्हती. त्यातही आम्ही 2 तास उशिरा दिल्लीत पोहोचलो आणि तिथे आम्हाला सांगण्यात आलं की शिड्यांवरूनच उतरायचं आहे. तर, व्हीलचेयर आधीपासून बूक करण्यात आली होती. मी एका एयर होस्टेसला माझ्या पत्नीची मदत करण्यास सांगितलं कारण माझ्याकडे चार बॅग होत्या. पण, मी मदत मागितल्यानंतर तिनं काही प्रतिक्रिया दिली नाही, सगळे एकमेकांकडे पाहत राहिले.’
Dear @airindia Please reclaim your wheelchair. I’m a lifetime loyalist. I believe you’ve got the nicest cabin crew in the sky, this post pains me to write. My wife and I book Pranaam and a wheelchair because she’s got a foot fracture that’s still healing. We’re flying to delhi.…
— Vir Das (@thevirdas) April 14, 2025
वीर दासनं पुढे सांगितलं की ‘त्यानंतर मी एयर इंडियाच्या एका पुरुष ग्राउंड स्टाफच्या व्यक्तीला आमची मदत करण्यासाठी सांगितलं. त्यानं माझ्याकडे पाहिलं. खांदा उचकवला आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं. फ्रॅक्चर असलं तरी सुद्धी माझी बायको शिड्यांवरून खाल उतरत होती. त्यानंतर मी एयर इंडियाच्या एका स्टाफमधील एका व्यक्तीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तो म्हणाला, सर काय करणार… माफ करा.
आम्ही टर्मिनलला पोहोचलो. Encalm च्या माणसाला सांगितलं की आम्ही आधीच व्हीलचेअर बुक केली आहे. पण त्याला जसं काहीच माहिती नाही. तिथे खूप व्हीलचेअर्स होत्या, पण स्टाफ कोणीच नव्हतं, कारण फ्लाइट उशीराने आली होती. मीच एक चेअर घेतली आणि तिला बॅगेज क्लेमपर्यंत आणि मग पार्किंगमध्ये गाडीजवळ नेलं. Encalm नं एअर इंडियाला कळवलं, पण तरीही कोणीच आलं नाही. असो, तुमची एक व्हीलचेअर दिल्लीच्या पार्किंगच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. ती परत घ्या,” असा खोचक टोला देखील वीरने यावेळी लगावला. दरम्यान, यापूर्वी देखील काही अभिनेत्यांनीही विमान प्रवासादरम्यान अशा समस्यांना सामोरी जावे लागल्याने नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा:
आता धावत्या ट्रेनमधून काढता येणार पैसे; ATMची सुविधा असलेली भारतातील ठरली पहिलीच एक्सप्रेस




