Air India – पश्चिम आशियामधील युद्धस्थितीमुळे एअर इंडियाने इस्रायलसाठीची विमानसेवा ३१ मे पर्यंत स्थगित केली हे. एअर इंडियाच्या अधिकार्याने वृत्तसंस्थेलायाबाबतची माहिती दिली आहे. नवी दिल्ली-तेल अवीव मार्गावरील उड्डाणे ३१ मे पर्यंत स्थगित केली आहेत, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. बहुतेक प्रमुख विमान कंपन्यांनी तेल अवीव मार्गावरील विमान उड्डाणे स्थगित केली आहेत. केवळ एल एआय, इस्राएअर, अरिका आणि एअर हैफा यासारख्या इस्रायली विमान कंपन्यांकडून या मार्गांवरील विमान सेवा सुरू ठेवली आहे. मात्र त्यांनीही या विमान प्रवासासाठी काही नियंत्रणे घातली आहेत. विमानसेवा स्थगित झाल्याने इस्रायलमध्ये राहणाऱ्या ४० हजारांहून अधिक भारतीयांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. Air India या भारतीय नागरिकांना वैयक्ति किंवा व्यवसायिक कारणांसाठी भारतात परत येणे यामुळे अवघड झाले आहे. तसेच या प्रदेशात निर्माण झालेल्या तणावामुळे तेथून बाहेर पडायचे आहे. इस्रायल सोडू इच्छिणाऱ्या भारतीयांना जॉर्डन किंवा इजिप्त या दोन देशांमध्ये भूमार्गाने प्रवेश करावा लागतो. इस्रायलबाहेर प्रवास करू इच्छिणाऱ्या भारतीयांना तेल अवीवमधील भारतीय दूतावास विविध मार्गांनी साहाय्य करत आहे. अशा भारतीय समुदायाला सहाय्य करण्यासाठी दूतावासाने २४ तास सुरू असलेली हेल्पलाइन सुरू केली आहे. राजदूत जे. पी. सिंग आणि दूतावासाच्या पथकाने शनिवारी इस्रायलमधील भारतीय कामगार आणि विद्यार्थ्यांशी दूरदृश्य माध्यमातून चर्चा केली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांना सहाय्य करण्याची हमी दिली.