MPL 2025 : एकाच थ्रोमध्ये उडाल्या दोन्ही एंडच्या स्टंप्स, भन्नाट रनआऊटचा VIDEO एकदा बघाच!

MPL 2025 dismisses Harsh Mogavira video viral : क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू असे काही पराक्रम करतात, जे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसतात. बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक सुपरमॅन बनतात, फलंदाज एका षटकात 37 धावा ठोकतात, किंवा गोलंदाजाने चेंडू न टाकताच विकेट घेतल्याचंही आपण पाहिलं असेल. पण आता एमपीएल २०२५ मधील एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये यष्टीरक्षकाने एका थ्रोमध्ये दोन्ही बाजूच्या स्टंप्स उडवल्या, जे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एकाच थ्रोने उडवल्या दोन्ही एंडच्या उडवल्या स्टंप्स –
या अनोख्या थ्रोची गोष्ट सांगण्यापूर्वी, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. क्रिकेटच्या मैदानावर कधी एकाच थ्रोने दोन्ही बाजूंच्या स्टंप्स उडवलेल्या पाहिल्या आहेत का? जर तुमचे उत्तर ‘नाही’ असेल, तर ही घटना तुमच्यासाठी आणखी रोमांचक ठरेल. खरेतर, महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ मध्ये रायगड रॉयल्स आणि पुणेरी बप्पा यांच्यातील सामना खेळला गेला. सामना तर जोरदार झालाच, पण त्यातून एक व्हिडिओ समोर आला, जो पाहून सर्वजण थक्क झाले.
ऑन स्ट्रायकरला रनआऊट करताना नॉन स्ट्रायकर झाला आऊट –
View this post on Instagram
२०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या रायगड रॉयल्सने पहिल्याच षटकात आपली मोठी विकेट गमावली. संघातील अनुभवी फलंदाज हर्ष मोगावीरा एका अनोख्या पद्धतीने धावबाद होऊन माघारी परतला. झाले असे की, सिद्धेश वीरने चेंडू लेग साइडला खेळला आणि धाव घेण्यासाठी पळाला. दुसऱ्या टोकाला उभा असलेला हर्ष प्रथम क्रीजबाहेर पडला, पण नंतर दोन्ही फलंदाजांनी धाव न घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर यष्टीरक्षकाने चेंडूच्या मागे धाव घेतली आणि यष्टीवर नेम साधला. चेंडू थेट यष्टीवर येऊन आदळला, पण तोपर्यंत फलंदाज क्रीजमध्ये परतला होता.
हर्ष मोगावीरा ठरला कमनशिबी –
आता यष्टीरक्षकाचा तो थ्रो बॅटिंग एंडचा स्टंप उडवल्यानंतर नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने गेला आणि तिथला लेग स्टंपही उडवला. यष्टीरक्षकाचा हा थ्रो जेव्हा नॉन-स्ट्रायकर एंडवर येऊन लागला, तेव्हा फलंदाज म्हणजेच हर्ष क्रीझच्या बाहेर होता. ज्यामुळे हर्षला नाईलाजाने पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या अनोख्या रनआऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सामन्याबद्दल बोलायचे प्रथम फलंदाजी करताना पुणेरी बाप्पा संघाने ४ बाद २०२ धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरात रायगड रॉयल्सचा संघ १३.१ षटकांत १०३ धावांवर गारद झाला. ज्यामुळे पुणेरी बाप्पा संघाने ९९ धावांनी सामना जिंकला.





