WI vs SA : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी द. आफ्रिकेने संघ केला जाहीर, ‘या’ स्टार खेळाडूंचा केला पत्ता कट…

WI vs SA T20 Series : दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे जिथे तो यजमान संघाविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर त्यांना 23 ऑगस्टपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या संदर्भात क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये एडन माक्ररम कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे, तर काही महत्त्वाच्या खेळाडूंना या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही.
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेल्या क्विन माफाकालाही प्रथमच आफ्रिकन संघात स्थान मिळाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध युवा वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाचाही समावेश करण्यात आला आहे. माफाका या वर्षाच्या सुरुवातीला अंडर-19 विश्वचषक खेळला होता. ज्यामध्ये त्याने 9.71 च्या सरासरीने 21 विकेट घेतल्या. याशिवाय अष्टपैलू जेसन स्मिथचाही प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. स्मिथने 2023/24 सीएसए टी-20 चॅलेंजमध्ये 41.57 च्या सरासरीने आणि 134.10 च्या स्ट्राइक रेटने 291 धावा केल्या होत्या.
टी-20 विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. सध्या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. ज्यांचा पहिला सामना अनिर्णित राहिला तर दुसरा सामना गुरूवारपासून सुरू झाला आहे.
अनेक खेळाडूंना संघात स्थान नाही….
वेस्ट इंडिजविरुद्ध संघाची घोषणा करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या निवड समितीचे सदस्य वॉल्टर म्हणाले की, अनेक खेळाडूंच्या निवडीचा विचार केला गेला नाही, ज्याचे कारण एकतर त्यांची दुखापत होती किंवा त्यांच्यावरील वर्कलोड मॅनेज करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. याशिवाय काही खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळण्यात व्यस्त आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघात अनेक मोठ्या नावांचा समावेश नाही, ज्यामध्ये क्विंटन डी कॉक, एनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि मार्को जानसन यांचा समावेश आहे.
White-ball head coach Rob Walter has today named the 15-player squad for the upcoming three-match T20 International (T20I) series against the West Indies, which gets underway later this month in Trinidad and Tobago.
Commenting on the squad, Walter said: “Several players were not… pic.twitter.com/hx8PJ4d6tX
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 14, 2024
टी- 20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – 23 ऑगस्ट (त्रिनिदाद)
दुसरा सामना – 25 ऑगस्ट (त्रिनिदाद)
तिसरा सामना – 27 ऑगस्ट (त्रिनिदाद)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन माक्ररम (कर्णधार), रीजा हेंड्रिक्स, रेयान रिक्लटन, ओटनिल बार्टमैन, पैट्रक क्रुगर, जेसन स्मिथ, नांद्रे बर्गर, क्वेन मफाका, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेनन फरेरिया, वियान मुल्डर, रीजा वेन डर डुसेन, ब्रेजोन फार्चुय्न, लुंगी एन्गीडी, लिजाद विलियमस.





