“बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि…”; जामनेर निवडणुकीवरून रोहित पवारांचा भाजपच्या नेत्यावर हल्लाबोल

Rohit Pawar | जामनेर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचे आणखी 9 उमेदवारही बिनविरोध निवडून आले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (दि. 21) जामनेर नगरपरिषद क्षेत्रातील 9 जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या या प्रक्रियेत भाजपकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आल्याचा विरोधकांचा दावा आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांचे ट्वीट
रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, “भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती. बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा.”
भाजपचे तथाकथित #संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती!
बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली… pic.twitter.com/2qHzk8iEpx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2025
“दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश द्यावा. गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन, नेत्यांच्या कुटुंबियांना नगरपरिषदांचे इनाम. भाजपची बिनविरोध कुटुंब कल्याण योजना,” असे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर रोहित पवार यांनी टीका केली. Rohit Pawar |
दरम्यान, जामनेर नगरपरिषद निवडणूकीत अध्यक्षपदासाठी साधना गिरीश महाजन या बिनविरोध विजयी झाली. तर भाजपाचे 9 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर आता नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 59 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. Rohit Pawar |
हेही वाचा :




