Sanjay Kakade : सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य करुनही शरद पवार शांत का बसले आहेत? बड्या नेत्याचा सवाल
Sanjay Kakade : या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून यावर पक्षातील नेते संजय काकडे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत एक मोठं वक्तव्य केले आहे.

Sanjay Kakade : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या टीकेवरुन मोठा वाद राज्याच्या राजकारणात निर्माण झाला आहे. (Sanjay Kakade)
या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून यावर पक्षातील नेते संजय काकडे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत एक मोठं वक्तव्य केले आहे.
“काँग्रेसचे विचारधारा घाणेरडी झाली आहे. सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य करुनही शरद पवार शांत का बसले आहेत? शरद पवारांनी काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी केले आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय काकडेंनी हे वक्तव्य केले.
यावेळी बोलताना त्यांनी मोठा इशाराही दिला. ते म्हणाले “आम्ही ४८ तास वाट पाहू आणि रस्त्यावर उतरुन आंदोलन करु.” पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षातून काढून टाका, अशी मागणीही संजय काकडे यांनी केली आहे. (Sanjay Kakade)
…अन्यथा रस्त्यावरुन उतरू : संजय काकडे (Sanjay Kakade)
इंदिरा गांधी यांच्याविरोधात ‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग झाल्यानंतर देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता, याची आठवण करून देत संजय काकडे यांनी विरोधकांनी टीका करताना राजकीय आणि वैचारिक मर्यादा पाळाव्यात, असे ठणकावून सांगितले.
दादांची कामाचा माणूस ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायची आहे
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुधवारी वैशाली नागवडे यांची पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर वैशाली नागवडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “राजकारणाची सुरुवात अजित पवारांमुळे सुरू झाली आहे. आज ते हवे होते. आज सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र मिळाले आहे. आज जबाबदारी खूप वाढली आहे. दादांची कामाचा माणूस ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायची आहे.” असे वैशाली नागवडे यांनी म्हटले आहे.



