Sharad Pawar : दुष्काळग्रस्त तालुक्यांना तातडीने मदत द्या; शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करताना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बाधीत तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Sharad Pawar : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करताना, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बाधीत तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 50 हजार रुपये, शेतमजूर कुटुंबांना प्रत्येकी २५ हजार रुपये विशेष मदत द्यावी, अशी मागणी (Sharad Pawar) पत्राद्वारे केली आहे. राज्यातील 36 पैकी ३१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, सोयाबीन, कापूस व कडधान्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे पेरणीखालील क्षेत्रातही मोठी घट झाल्याचे त्यांनी निर्दर्शनास आणून दिले. १ जून ते १५ सप्टेंबरदरम्यान राज्यात ६४८ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा १९ टक्के कमी असल्याचा दावा त्यांनी केला.
शरद पवारांनी (Sharad Pawar) तातडीने शेतकरी कर्जमाफी लागू करून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान ५० हजारांवरून एक लाख रुपये करण्याची, तसेच २०२५-२६ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या आणि यंदा परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत आणण्याची मागणीही त्यांनी केली.
याशिवाय पीक विमा, मागील वर्षीच्या पीक नुकसानीची मदत, टँकर, चारा छावण्या, पशुवैद्यकीय सेवा आणि रोजगार हमीची विशेष कामे तातडीने सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. परिस्थितीवर दररोज देखरेख ठेवण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची मागणीही पवारांनी केली.






