“परीक्षा उत्तीर्ण तरीही नियुक्तीस टाळाटाळ.. कृषी मंत्र्यांनी फाइल का अडवून ठेवली ?” विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीआधी आचारसंहित लागणार असल्याने विकासकामांना ब्रेक लागेल. हाच मुद्दा हेरत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याबाबत पाठवण्यात आलेली फाइल कृषिमंत्र्यांनी का अडवून ठेवली आहे? असा सवाल करत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स वर पोस्ट करत कृषिमंत्र्यांना धारेवर धरले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याबाबत पाठवण्यात आलेली फाइल कृषिमंत्र्यांनी का अडवून ठेवली आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात पदस्थापना आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण होवून 7 महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही उमेदवारांना नियुक्ती देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे.
मुख्य सचिवांनी तत्काळ मान्यता दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी 3 आठवड्यापासून फाइल अडवून ठेवण्याचे कारण काय याचे उत्तर कृषिमंत्र्यांनी उमेदवारांना द्यावे. निवडणुकीची आचासंहिता लागण्यापूर्वी सरकारने उत्तीर्ण उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्र द्यावे अशी मागणी वडेट्टीवारांनी सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याबाबत पाठवण्यात आलेली फाईल कृषी मंत्र्यांनी का अडवून ठेवली आहे?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागात पदस्थापना आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण होवून ७ महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही उमेदवारांना नियुक्ती…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 11, 2024





