Dahi Handi 2024: कृष्ण जन्माष्टमीनंतर दहीहंडी उत्सव का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर…

यावेळी श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. मात्र कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. हा सण नेमका का साजरा केला जातो? त्यामागचा इतिहास काय आहे ते जाणून घेऊयात…
दहीहंडी सण का साजरा केला जातो?
दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्ण लहानपणी खूप खोडकर होते. कृष्णाला लोणी खूप आवडत असे. म्हणूनच तो वृंदावनातील लोकांच्या घरातून लोणी चोरायचा आणि मित्रांनाही खाऊ घालायचा. बाळकृष्णाने लोणी चोरी केल्याने गावातील महिलांना त्रास व्हायचा.
त्यामुळे त्याच्यापासून लोणी वाचवण्यासाठी लोणीची भांडी घरातील उंच ठिकाणी टांगलेली असायची. पण खोडकर कृष्णाने त्याच्या मित्रांसह लोणीही चोरत असे. उंच टांगलेल्या लोणीच्या हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी कृष्ण मित्रांसोबत वर्तुळाकार करून त्यावर चढत असे आणि मडक्यातील लोणी चोरत असे. येथूनच दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली.
दहीहंडी कशी साजरी केली जाते?
लोणी चोरणारी कृष्णाची ही लीला दहीहंडी उत्सव म्हणून साजरी केली जाते. यामध्ये हंडी उंचावर टांगली जाते. मुले मजले तयार करतात. एक मुलगा त्याच्या साथीदारांच्या खांद्यावर चढून हंडी गाठतो आणि तो फोडतो. हंडी फोडायला जाणाऱ्या मुलाला गोविंदा म्हणतात. या संपूर्ण प्रक्रियेला दहीहंडी असे म्हणतात.
महाराष्ट्रात दहीहंडी कशी साजरी होते?
दरवर्षी महाराष्ट्रात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. ठाणे, मुंबई पुण्यात मोठ्या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी 8 ते 9 थर रचून गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडली जाते आणि विजेत्या गोविंदापथकाला बक्षीस देखील दिले जाते. या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना बोलवले जाते. या सणाला तरुण वर्ग मोठ्या उत्साहात सहभागी होतात.





