मोदी जे करतात ते कॉंग्रेस का करू शकत नाही? बदरूद्दीन अजमल यांची कॉंग्रेसवर टीका
Updated On:

नवी दिल्ली – राजधानीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला न बोलावल्याबद्दल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंटचे प्रमुख बदरूद्दीन अजमल यांनी कॉंग्रेस पक्षावर टीका केली आहे. विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की इंडियाच्या बैठकीला मला बोलावले नाही. छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानात कॉंग्रेस एकटी लढली आहे आणि त्याचा काय परिणाम झाला ते सगळ्यांसमोर आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्यांच्या विकासाबद्दल बोलत असतात. कॉंग्रेस पक्ष असे का करू शकत नाही?





