Shiv Sena Symbol | केंद्रीय निवडणूक आयोगाने 2022 मध्ये एकनाथ शिंदे गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. यासंदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांचे खंडपीठ अंतिम युक्तीवाद ऐकून घेणार आहेत. यात आमदारांच्या अपात्रतेबाबतही कोर्ट निकाल देणार आहे. शिवसेनेसोबत राष्ट्रवादीच्या याचिकेवरही आज सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. यापूर्वी कोर्टाने आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले होते. यानंतर आजच्या या सुनावणीत काय निकाल लागणार? याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार? यासाठी या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हेही वाचा : Pimpri : आरक्षण सोडतीत प्रस्थापित नेत्यांना धक्का; विधानसभा लढवलेल्या उमेदवारांची वाट बिकट