Suchitra Bandekar : पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकरांनी स्पष्टच सांगितलं म्हणाल्या…

Suchitra Bandekar : १६ अॅागस्ट या दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आई ज्योती चांदेकर यांच्या निधनाची पोस्ट शेअर केली होती.
ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी कोणाच्याच पचनी पडलेली नाही. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत त्या पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांच्या निधनानंतर या मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त करत त्यांच्या आठवणी पोस्टद्वारे शेअर केल्या आहेत. अशातच आता पूर्णा आजींची भूमिका कोण करणार याची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी आता या मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
नुकतीच सुचित्रा बांदेकर यांनी राजश्री मराठी वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ज्योती चांदेकर यांच्या आठवणींनी उजाळा दिला. आता त्यांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आम्ही अजून काहीच विचार केलेला नाही. आम्हाला आणि प्रेक्षकांनाही सावरायला वेळ हवा आहे. प्रेक्षकांच्या कमेंट्स आहेत की पूर्णा आजींच्या भूमिकेत त्यांच्याशिवाय अजून कोणाला बघू शकत नाही. त्यामुळे बघू, विचार करु. अशी प्रतिक्रिया निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी दिली आहे.
सुचित्रा बांदेकर भावूक
ज्योती चांदेकर या रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यावेळी सुचित्रा बांदेकर यांचे पती आदेश बांदेकर आणि मुलगा सोहम बांदेकर त्यांना भेटायला रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी “सुचित्राला सांग हं मला रिप्लेस करु नको. मी बरी होऊन येणार आहे”. असं आदेशला सांगितलं होतं. यावर त्याने कोणी तुम्हाला असं सांगत असल्याचं विचारलं तर त्या म्हणाल्या या नर्स बातम्या दाखवतात. असं त्या म्हणाल्या. किती प्रेम होतं त्यांच्या शब्दात मांडता येऊ शकतो, असं म्हणत मी सुचित्रा बांदेकर भावूक झाल्या होत्या.
अनेकांसाठी धक्का
हेही वाचा : भूकंपाच्या धक्क्याने हादरली पृथ्वी ; भारतापासून पाकिस्तानपर्यंत जाणवले धक्के ; ४.० रिश्टर स्केलची तीव्रता





