भूकंपाच्या धक्क्याने हादरली पृथ्वी ; भारतापासून पाकिस्तानपर्यंत जाणवले धक्के ; ४.० रिश्टर स्केलची तीव्रता

Earthquake। भूकंपांनी आतापर्यंत अनेक देशांमध्ये विनाश घडवून आणला आहे. दर महिन्याला जगातील कोणत्या ना कोणत्या देशात भूकंप होतात. त्यातच आज भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. एका वृत्तसंस्थेनेनुसार, आज सकाळी हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये ४.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी ३.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्येही भूकंप झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ३.२७ वाजता हिमाचल प्रदेशातील चंबा येथे पहिला भूकंप जाणवला. त्याची तीव्रता ३.३ नोंदवण्यात आली. त्यानंतर पहाटे ४.३९ वाजता ४.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याची खोली १० किलोमीटर होती. यापूर्वी हिमाचलमधील कांगडा येथेही भूकंप झाला होता. सोमवारी (१८ ऑगस्ट) रात्री ९.२८ वाजता ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याची खोलीही १० किलोमीटर होती. हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपाचे केंद्र धर्मशाळेपासून २३ किलोमीटर अंतरावर होते.
पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे घबराट Earthquake।
भारतासोबतच पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे २.३८ वाजता पाकिस्तानला ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप आला. मात्र, यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. आतापर्यंत पाकिस्तानमध्ये अनेक वेळा भूकंप झाले आहेत. २९ मे रोजी ४.४ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. त्याच वेळी १२ मे रोजी ४.६ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला.
भारतातील आसाममध्येही भूकंप Earthquake।
सोमवारी आसाममधील नागाव येथे ४.३ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. या महिन्यात राज्यात भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही सातवी वेळ आहे, तर जिल्ह्यात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजण्यात आली. जगात सर्वाधिक भूकंप जपान, इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये होतात. भूकंपामुळे त्सुनामीचा धोका देखील आहे.





