लोकसभेत काँग्रेसचा नेता कोण होणार? कन्हैया कुमार म्हणाले…

Kanhaiya Kumar| यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले आहे. यात काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकांपेक्षा यंदा काँग्रेसने उत्तम कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक २०२४ नंतर पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज सुरू होणार आहे.
या बैठकीला राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निकालानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांच्याकडे लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
यासंदर्भात आता काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कोणाला पाहण्याची इच्छा आहे? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर “आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल,” असे काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी उत्तर दिले. दरम्यान, या बैठकीत लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याचीही निवड होण्याची शक्यता आहे. Kanhaiya Kumar|
दरम्यान, शनिवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा होणार आहे. याशिवाय पक्षाचे नेतेही नव्या सरकारची भूमिका आणि तेथील धोरणे लक्षात घेऊन आपली रणनीती ठरवतील. दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये सध्या बैठक सुरू आहे. या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष लोकसभा निवडणूक २०२४ मधील पक्षाच्या कामगिरीचा विचार करतील. तसेच पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक सूचनाही दिल्या जाण्याची शक्यता आहे. Kanhaiya Kumar|
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु
लोकसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीच्या जोरावर काँग्रेस देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे. २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने आपल्या जागांची संख्या ५२ वरून ९९ पर्यंत वाढवली आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीए सत्ता स्थापन करणार आहे. मात्र, इंडिया आघाडीला विरोधी पक्षात बसावं लागणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.
एकीकडे, नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तर त्यांच्या शपधविधीच्या एक दिवस आधी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. या बैठकीत आगामी रणनितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
“आम्हाला मेरिटने जागा मिळाल्या असत्या तर…” ; नाना पटोलेंचे महत्वाचे विधान





