Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पडद्यामागचा सुत्रधार कोण? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण
Cockroach Janta Party: 'अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली'

Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनं नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके करत आहे. त्यापार्श्वभूमीवर सीजीपे पुण्यात आंदोलन करत आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अभिजीत दीपके यांच्याविषयी मोठा दावा केला आहे. (Cockroach Janta Party)
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत मिटींग झाली. त्या मिटींगनंतरच दिपके भारतात आला असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. अभिजीत दीपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या भेटीचा फोटो आपल्याला एकाने पाठवला असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

Cockroach Janta Party: ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पडद्यामागचा सुत्रधार कोण? बड्या नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? (Cockroach Janta Party)
अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, त्या भेटीनंतरच दिपके भारतात आले, अशी माहिती काही लोकांनी दिली आहे. हे आरोप नसून माझी माहिती लोकांनी पोहोचवलेली आहे,तेच मी सांगत आहे, आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं, मात्र जेव्हा काही माहिती या सगळ्या संदर्भात समोर येते, तेव्हा माध्यमांसमोर मांडणे आवश्यक आहे.
अमेरिकेत
कोण कोणास भेटले? pic.twitter.com/bCF17dYzGF— Sanjay Raut (@rautsanjay61) June 11, 2026
कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनाला गेला नाही. तरुणांचे प्रश्न आणि तरुणांना आम्ही पाठिंबा दिला. जे तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्या तरुणांचे सरकारने ऐकायला हवं यासाठी आम्ही भूमिका मांडली. या माध्यमातून सरकारला मदत करत असेल तर त्यावर लक्ष ठेवणं आमचं काम आहे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. (Cockroach Janta Party)
हेही वाचा:





