3 Idiots Sequel : चौथा इडियट कोण? 3 इडियट्सच्या सिक्वलबाबत मोठी अपडेट समोर
3 Idiots Sequel : राजकुमार हिरानी आणि आमिर खान लवकरच चित्रपटाच्या पटकथेला अंतिम स्वरूप देण्यासाठी महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

3 Idiots Sequel : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेल्या ३ इडियट्सच्या (3 Idiots Sequel ) सिक्वेलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
राजकुमार हिरानी आणि आमिर खान लवकरच चित्रपटाच्या पटकथेला अंतिम स्वरूप देण्यासाठी महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिक्वेलच्या कथानकावर आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांच्यात गेल्या काही महिन्यांत अनेक बैठका झाल्या आहेत. आतापर्यंत सहा बैठका पार पडल्या असून, सातव्या आणि अंतिम बैठकीनंतर चित्रपटाच्या निर्मितीला वेग मिळण्याची शक्यता आहे. (3 Idiots Sequel )
विशेष म्हणजे, या सिक्वेलची कथा मूळ चित्रपट जिथे संपला होता तिथून पुढे सरकणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कथानकात सुमारे 10 वर्षांचा कालावधी पुढे नेण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे रँचो, फरहान आणि राजू यांच्या आयुष्यात काय बदल झाले, हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, सिक्वेलमध्ये आणखी एका नव्या पात्राची भर पडणार असल्याचे वृत्त आहे. या वेळी ‘3 इडियट्स’मध्ये तीन नव्हे तर चार ‘इडियट्स’ पाहायला मिळू शकतात. या नव्या भूमिकेसाठी अभिनेता विकी कौशलचे नाव चर्चेत असून, तो चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारू शकतात. (3 Idiots Sequel)

3 Idiots Sequel : चौथा इडियट कोण? 3 इडियट्सच्या सिक्वलबाबत मोठी अपडेट समोर
विकी कौशलने यापूर्वी राजकुमार हिरानी यांच्या संजू आणि डंकी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, आमिर खानसोबत त्याची ही पहिलीच मोठी स्क्रीन शेअरिंग असू शकते.
निर्मात्यांच्या नियोजनानुसार, ‘3 इडियट्स’चा बहुप्रतीक्षित सिक्वेल 2028 च्या अखेरीस किंवा 2029 च्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.





