Sai Pallavi : कोण आहे साई पल्लवीचा फेव्हरेट हिरो? स्वतः सांगितलं नाव म्हणाली “‘तो फक्त अभिनेता नाही, तर…”
Sai Pallavi : अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान साई पल्लवीने तिच्या चित्रपट प्रवासाविषयी बोलताना तिच्या आवडत्या अभिनेत्याचाही उल्लेख केला.

Sai Pallavi : दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी तिच्या नैसर्गिक सौंदर्य, दमदार अभिनय आणि अप्रतिम नृत्यकौशल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. ग्लॅमरच्या आड न जाता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्टारडम मिळवले असून देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान साई पल्लवीने तिच्या चित्रपट प्रवासाविषयी बोलताना तिच्या आवडत्या अभिनेत्याचाही उल्लेख केला. लहानपणापासूनच चित्रपटांची आवड असलेल्या साई पल्लवीला एका दिग्गज अभिनेत्यामुळे अभिनयाची प्रेरणा मिळाल्याचे तिने आवर्जून सांगितलं.
विशेष म्हणजे, तिने ज्या अभिनेत्याचे नाव घेतले ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. स्वतःपेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या या अभिनेत्याला ती आपला आवडता हिरो मानते, असे सांगत साई पल्लवीने कोणताही संकोच न बाळगता त्या अभिनेत्याविषयीचा आदर आणि प्रेम व्यक्त केले.
हेही वाचा : Rajya Sabha TDP : संसदेत प्रभाव वाढवण्याचा प्लॅन; ‘या’ पक्षाकडून राज्यसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा
तिच्या मते, हा अभिनेता केवळ उत्कृष्ट कलाकार नाही तर एक महान व्यक्तिमत्त्वही आहे. त्यांचा चित्रपटातील संघर्ष, यश आणि कारकीर्द अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी असल्याचेही तिने नमूद केले.
साई पल्लवीने ज्यांचे नाव घेतले ते म्हणजे दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवी. अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या चिरंजीवींचा प्रभाव आजही कायम असून ते नव्या पिढीतील कलाकारांसाठी प्रेरणास्थान मानले जातात. अनेकांचे ते आवडते अभिनेते असून साई पल्लवी देखील त्यांची खूप मोठी फॅन आहे.
साई पल्लवीच्या चिरंजीवी यांचं नाव घेतल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी “प्रतिभा ही प्रतिभेलाच ओळखते” अशा प्रतिक्रिया देत साई पल्लवीच्या निवडीचे कौतुक केले आहे. अभिनयाला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या साई पल्लवीने चिरंजीवी यांना आपला सर्वकालीन आवडता नायक म्हटल्याने चिरंजीवी यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा : Hina Khan : हिना खानने पती रॉकी जायस्वालसोबत रोमॅंटिक अंदाजात साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस







