Hina Khan : हिना खानने पती रॉकी जायस्वालसोबत रोमॅंटिक अंदाजात साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस
Hina Khan : हिना आणि रॉकी पहिल्या वेडिंग एनिव्हर्सरीची तारीखच विसरले

Hina Khan : टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान आणि तिचा पती रॉकी जायस्वालने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा केला. या जोडप्याने नुकतेच इन्स्टाग्रामवर या खास सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहतेही या जोडप्याला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत आहेत.
या सेलिब्रेशनची सर्वात रंजक आणि मजेशीर बाब म्हणजे हिना आणि रॉकी आपल्या पहिल्या वेडिंग एनिव्हर्सरीची तारीखच विसरून गेले होते. या गोष्टीचा खुलासा खुद्द हिना खानने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे केला. तिने सांगितले की, आमच्या दोघांसाठी प्रत्येक दिवस खास असतो, त्यामुळे आम्ही तारखांवर फारसे लक्ष देत नाही.
फोटो शेअर करताना हिनाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लोक म्हणतात की हा खूप खास दिवस आहे, पण मला वाटते की आमच्यासाठी प्रत्येक दिवसच खास असतो. तारखा महत्त्वाच्या नसतात, क्षण महत्त्वाचे असतात. स्वतःच्या वाढदिवसाव्यतिरिक्त आम्हाला इतर काही लक्षातही राहत नाही. आमच्यात पहिल्यापासून असंच आहे.’
View this post on Instagram
हिनाने पुढे लिहिले, ‘आमचे कुटुंब आणि हितचिंतकांचे मनापासून आभार, ज्यांनी आम्हांला आठवण करून दिली की आज आमची पहिली एनिव्हर्सरी आहे.’ हिनाने आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभारही मानले. हिना खानने एनिव्हर्सरी केकचे फोटो देखील शेअर केले आहेत, जो तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी पाठवला होता. याशिवाय, अभिनेत्रीला तिच्या पतीकडून एक प्रेमळ चिठ्ठीही मिळाली आहे.
सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो
हिना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आणि रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. फोटोंमध्ये केक, सजावट आणि या जोडप्याच्या सुंदर क्षणांची झलक पाहायला मिळत आहे.
हिना खान आणि रॉकी जायस्वाल यांनी ४ जून २०२५ रोजी लग्न केले होते. प्रदीर्घ काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले असून, हा खास दिवस त्यांनी आपल्या कुटुंबासह आणि जवळच्या लोकांसोबत साजरा केला. दरम्यान, हिना खान शेवटची ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. यामध्ये ती तिच्या पतीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती.
हेही वाचा :





