IND vs PAK : पाकिस्तानचा दावा खोटा; अँडी पायक्रॉफ्टने माफी मागितली नाही, मग बंद खोलीत काय घडलं? जाणून घ्या

IND vs PAK Handshake Controversy in Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये यूएईविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ स्टेडियमवर उशिरा पोहोचला, कारण त्यांनी सामना रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी संघाकडून माफी मागावी, अशी मागणी केली होती. पीसीबीने दावा केला की, पायक्रॉफ्ट यांनी संघाच्या कर्णधार, व्यवस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक यांच्याकडे माफी मागितली. मात्र, आता याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे की, पायक्रॉफ्ट यांनी कोणाकडेच माफी मागितली नाही.
पायक्रॉफ्ट यांनी मागितली नाही माफी –
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी पीसीबी किंवा पाकिस्तानच्या कर्णधाराकडे माफी मागितली नाही. अहवालात म्हटले आहे की, माफी मागण्याचा प्रश्नच नव्हता, कारण पायक्रॉफ्ट यांनी कोणतीही चूक केली नव्हती. खरे तर, पायक्रॉफ्ट यांनीच पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा, व्यवस्थापक नावेद अक्रम चीमा आणि मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांना आपल्या खोलीत बोलावून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
Pakistanis are spreading this video without any sound and claiming refree Andy Pycroft apologised to Pakistan’s manager and captain.
But the reality is something else.
As per my sources, Andy Pycroft told Pakistan team captain Salman Agha that if they don’t play the match then… pic.twitter.com/DsmHo4ymDs
— Incognito (@Incognito_qfs) September 17, 2025
मोहसिन नक्वी यांचा माफीचा दावा –
PCB chairman Mohsin Naqvi wins the battle against the ICC after Andy Pycroft apologises to Pakistan manager, captain.#PAKvUAE | #Cricket | #Pakistan | #MohsinNaqvi | #AsiaCup2025 | #Dubai pic.twitter.com/nQa4CV8uSn
— Khel Shel (@khelshel) September 17, 2025
विशेष म्हणजे, पीसीबीने सोशल मीडियावर प्रसारित केलेला व्हिडीओ म्यूट आहे, म्हणजेच त्यात कोणताही आवाज नाही. यावरून पीसीबी खोटे दावे करत असल्याचे दिसून येते. पीसीबीचे प्रमुख आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तान आणि यूएई सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, मॅट रेफरीने पाकिस्तानी संघाची माफी मागितली आहे. त्यांनी असा प्रसंग घडू नये, असेही म्हटले.
हेही वाचा – Mohsin Naqvi : दिवसभराच्या ड्राम्यानंतर पाकिस्तान का मागे हटला? नक्वींनी सांगितले बहिष्कार न टाकण्याचे कारण!
मोहसिन नक्वी यांनी दावा केला की, 14 सप्टेंबर रोजी झालेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयसीसीकडे केली होती. या घोषणेनंतर पाकिस्तानने यूएईविरुद्ध सामना खेळला आणि 41 धावांनी विजय मिळवून सुपर-4 मध्ये प्रवेश केला. आता 21 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
हेही वाचा – Ramiz Raja : भारत-पाक वादात रमीज राजांचा दावा फसवा, पायक्रॉफ्टबाबत सत्य आलं समोर!
आयसीसीचे स्पष्टीकरण –
यापूर्वी, आयसीसीने पीसीबीच्या तक्रारीला निराधार ठरवले होते आणि रेफरी पायक्रॉफ्ट यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याचे म्हटले होते. हस्तांदोलनाचा मुद्दा रेफरीच्या कार्यकक्षेत येत नसून तो आयोजक आणि संघ व्यवस्थापन यांचा विषय असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले होते. हा वाद अद्याप चर्चेचा विषय आहे, तर आता सर्वांचे लक्ष 21 सप्टेंबरच्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे.





