Kal Somani : कोण आहेत कल सोमाणी? ज्यांनी राजस्थान रॉयल्ससाठी मोजले तब्बल १.६३ बिलियन डॉलर्स, जाणून घ्या
Kal Somani : राजस्थान रॉयल्स (RR) या संघाची मालकी बदलली असून, आता अमेरिकेतील दिग्गज उद्योजक कल सोमाणी यांनी या संघाची धुरा आपल्या हाती घेतली आहे.

Who is Kal Somani Rajasthan Royals Owner : आयपीएल २०२६ च्या रणधुमाळीपूर्वी मैदानाबाहेर एक ऐतिहासिक व्यवहार पूर्ण झाला आहे. राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझीची १.६३ बिलियन अमेरिकन डॉलर्स (१५,२८९ कोटी रुपये) इतक्या विक्रमी किमतीत विक्री झाली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि उद्योजक कल सोमाणी यांनी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या एका समूहाचे नेतृत्व करत हा संघ खरेदी केला आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
कोण आहेत कल सोमाणी?
कल सोमाणी हे जागतिक फायनान्स, प्रायव्हेट इक्विटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. फिनटेकपासून ते इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत पसरलेल्या त्यांच्या व्यवसायाने त्यांना ही मोठी आर्थिक ताकद दिली आहे. विशेष म्हणजे, राजस्थान रॉयल्सच्या विक्रीची ही बातमी काही तास ‘सर्वात महागडी डील’ म्हणून चर्चेत होती, मात्र त्यानंतर लगेचच आरसीबीची (RCB) १.७८ बिलियन डॉलर्सला विक्री झाल्याने राजस्थानची डील दुसऱ्या क्रमांकावर आली. तरीही, राजस्थान रॉयल्सची ही व्हॅल्युएशन जागतिक क्रीडा विश्वात एक विक्रम मानली जात आहे.
२००८ ते २०२६: किंमतीत प्रचंड वाढ –
Rajasthan Royals has become the most expensive team in the world. 🔥
American entrepreneur Kal Somani has individually purchased the Rajasthan Royals for a record $1.63 billion, which is more than ₹15,000 crore. 😳
Following this deal, the team’s value has skyrocketed, making… pic.twitter.com/HpLZtlBCSg
— Cricket Central (@CricketCentrl) March 24, 2026
२००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाले, तेव्हा राजस्थान रॉयल्सची किंमत केवळ ६७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २६७ कोटी रुपये) होती. आज १८ वर्षांनंतर ही किंमत १५,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे केवळ राजस्थान रॉयल्सचे यश नसून आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये झालेली अफाट वाढ दर्शवते.
राजस्थान रॉयल्सची निवड का?
राजस्थान रॉयल्स हा आयपीएलचा पहिला चॅम्पियन संघ आहे. २००८ मध्ये दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली या संघाने ‘अंडरडॉग’ असूनही विजेतेपद पटकावून सर्वांना थक्क केले होते. वॉर्न केवळ कर्णधार आणि प्रशिक्षक नव्हता, तर त्याने केलेल्या करारानुसार संघात त्याची ३ टक्के भागीदारीही होती.
अशा ऐतिहासिक आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघावर सोमाणी यांनी आपली मोहोर उमटवली आहे. दरम्यान, आयपीएल २०२६ चा आगामी हंगाम मात्र जुन्याच मालकी हक्कांतर्गत खेळला जाणार असून, त्यानंतर कल सोमाणी पूर्णपणे पदभार स्वीकारतील.





