चौथ्या टप्प्याअखेर कोण आघाडीवर? चार टप्प्यांतील मतदानाचा संपूर्ण लेखाजोखा, वाचा….

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडले. राज्यातील 11 तर देशातील 96 मतदारसंघातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 59.64 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
दुसरीकडे देशात 96 मतदारसंघात झालेल्या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत 67.25 टक्के मतदान झाले आहे. यासह देशातील २२ राज्यांमध्ये आतापर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे, या टप्प्यानंतर नेमके कोणाचे पारडे जड आहे, एनडीए आघाडीवर आहे की इंडिया, याबाबद उत्सुकता शिगेला पोचली आहे.
राज्यभरात अनेक नागरिकांना मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तर काही भागात मतदानादरम्यान गोंधळाच्या काही घटना समोर आल्या आहेत. रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील मतदान केंद्रावर 4 तास वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर आली होती. वीज पुरवठा खंडित झाल्याने मोबाईल टॉर्च लावून कर्मचाऱ्यांनी काम केले. तब्बल चार तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.
चौथ्या टप्प्यासह अनेक राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. उत्तराखंड, तामिळनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आसाम, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, मेघालय, सिक्कीम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि अरुणाचल राज्यात चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया संपली आहे. तरी आता, २०२४ लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदानाचा संपूर्ण लेखाजोखा समजून घेऊयात:-
लोकसभेच्या एकूण जागा : ५४३
चार टप्प्यात मतदान झाले – ३७९
आतापर्यंत किती जागांवर मतदान झाले?
पहिला टप्पा – १९ एप्रिल – २१ राज्यातील १०२ जागा
दुसरा टप्पा – २६ एप्रिल – १२ राज्यांतील ८८ जागा
तिसरा टप्पा – ७ मे- ११ राज्यांतील ९३ जागा
चौथा टप्पा – १३ मे – १० राज्यांतील ९६
आगामी मतदान तारखा
पाचवा टप्पा – २० मे – ८ राज्यांत ४९ जागा
सहावा टप्पा – २५ मे – ७ राज्यांत ५८ जागा
सातवा टप्पा – १ जून – ८ राज्यांत ५७ जागा
या राज्यांमध्ये लोकसभेची प्रत्येकी एक जागा
१. उत्तर-पूर्व सिक्कीम- १९ एप्रिलला मतदान
२. नागालँड – १९ एप्रिलला मतदान
३. मिझोराम- १९ एप्रिलला मतदान
कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?
महाराष्ट्र- ११ जागा- 59.64%
तामिळनाडू – ३९ जागा – ६९.७२%
उत्तराखंड- ५ जागा-५७.२२%
केरळ -२० जागा – ७१.२७%
गोवा – २ जागा – ७५.२०%
अरुणाचल प्रदेश – २ जागा – ७७.६८%
नागालँड – ५७.७३%
मिझोराम- १ जागा ५६.८७%
सिक्कीम – १ जागा ७९.८८%
मेघालय २ जागा – ७६.६०%
छत्तीसगड – ११ जागा – ७१.८६%
आसाम – १४ जागा – ८०.३८%
मणिपूर – २ जागा – ८०.७८%
त्रिपुरा – २ जागा – ८०.९२ %
राजस्थान – २५ जागा ६१.३५%
कर्नाटक – २८ जागा – ६९.९९%





