Helle Lyng: हेले लिंग कोण? ज्यांनी पीएम मोदींना भारतातील पत्रकार स्वातंत्र्याबद्दल विचारला प्रश्न
Helle Lyng: हेले लिंग या ओस्लोस्थित डागसाविसेन या वृत्तपत्राशी संलग्न पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्या प्रामुख्याने राजकारण विषयाचे वार्तांकन करतात. मोदींच्या नॉर्वे दौऱ्याचे वृत्तांकन करण्यासाठी त्या कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या.

Helle Lyng: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान भारतातील प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत प्रश्न विचारणारी नॉर्वेजियन पत्रकार हेले लिंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. “मी कोणतीही विदेशी गुप्तहेर नाही, फक्त माझे पत्रकार म्हणून काम करत होते,” असे स्पष्टीकरण देत लिंग यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली आहे.
पंतप्रधान मोदी आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर हा वाद निर्माण झाला. कार्यक्रमाच्या शेवटी हेले लिंग यांनी भारतातील प्रेस फ्रीडमबाबत मोदींना प्रश्न विचारला. “तुम्ही जगातील सर्वात मुक्त पत्रकारिता असलेल्या देशातील पत्रकारांचे काही प्रश्न तुम्ही का घेत नाहीत?”, असा त्यांचा सवाल होता. मात्र, त्यांना उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नॉर्वेमध्येही त्यावर चर्चा सुरू झाली आहे.
Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to.
Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba.
It is our job to question the powers we cooperate… pic.twitter.com/vZHYZnAvev
— Helle Lyng (@HelleLyngSvends) May 18, 2026
डागसाविसेनशी संलग्न पत्रकार –
हेले लिंग या ओस्लोस्थित डागसाविसेन या वृत्तपत्राशी संलग्न पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्या प्रामुख्याने राजकारण विषयाचे वार्तांकन करतात. मोदींच्या नॉर्वे दौऱ्याचे वृत्तांकन करण्यासाठी त्या कार्यक्रमस्थळी उपस्थित होत्या.
I never thought I would have to write this, but I am not a foreign spy of any sort, sent out by any foreign government.
My work is journalism, primarily in Norway now.
— Helle Lyng (@HelleLyngSvends) May 18, 2026
घटनेनंतर लिंग यांनी ‘एक्स’वर व्हिडीओ शेअर करत पत्रकारांचे काम लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे असल्याचे म्हटले. त्यांनी नॉर्वेचा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात अव्वल क्रमांक असल्याचा उल्लेख करत भारताच्या क्रमवारीवरही भाष्य केले.
परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण –
या प्रकरणानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी भारतातील माध्यम व्यवस्थेचे समर्थन केले. परदेशातील काही टीकाकार निवडक अहवाल आणि स्वयंसेवी संस्थांच्या आधारे निष्कर्ष काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
When there is nothing to hide, there is nothing to fear.
What happens to India’s image when the world sees a compromised PM panic and run from a few questions? https://t.co/tOO8vzESpf
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 18, 2026
दरम्यान, या मुद्द्यावरून भारतातही राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडीओ शेअर करत मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना टाळत असल्याची टीका केली. तर भाजपने हा नियमित राजनैतिक कार्यक्रम राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालविय यांनी नॉर्वेच्या पंतप्रधानांनीही पत्रकारांचे प्रश्न घेतले नसल्याचे सांगत विरोधकांवर पलटवार केला.





