Gulveer Singh Silver : सैन्यातील नोकरीसाठी धावायला सुरुवात केली अन् ग्लास्गोत रचला इतिहास! गुलवीर सिंहने पटकावलं रौप्यपदक
Gulveer Singh Silver : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात १०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ॲथलीट ठरला आहे.

Gulveer Singh Wins Silver Medal 10000m Race Glasgow CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow Commonwealth Games 2026) भारतीय सैन्यातील नायब सुभेदार गुलवीर सिंहने (Gulveer Singh) १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक (Silver Medal) जिंकून इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात १०,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ॲथलीट ठरला आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढ जिल्ह्यातील सिरसा गावच्या या २७ वर्षीय खेळाडूचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
पहिलाच भारतीय ॲथलीट ठरला –
पावसात झालेल्या शर्यतीत, गुलवीर सिंहने सुरुवातीपासूनच स्वतःला आघाडीच्या गटात टिकवून ठेवले. ऑस्ट्रेलियाचा काय रॉबिन्सन शेवटच्या ४०० मीटरमध्ये पुढे गेला, पण गुलवीरने शेवटच्या लॅपमध्ये उत्कृष्ट स्प्रिंट मारून २७:४९.७८ वेळेसह रौप्य पदक जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सनने सुवर्णपदक जिंकले, तर आइल ऑफ मॅनच्या डेव्हिड मुलार्कीने कांस्यपदक पटकावले. गुलवीर हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब पल्ल्याच्या धावण्याच्या प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. विशेष म्हणजे, १९८६ नंतर प्रथमच या प्रकारात एकाही आफ्रिकन धावपटूला पदक मिळवता आले नाही.
Gulveer Singh creates history, becoming the first Indian to win a Commonwealth Games medal in the Men’s 10,000m with a brilliant silver medal finish. 👏
Watch the Commonwealth Games Glasgow 2026 LIVE & EXCLUSIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork… pic.twitter.com/6VIXZysfBJ
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 28, 2026
सैन्यात भरती होण्यासाठी सुरू केला धावण्याचा सराव!
Aligarh, Uttar Pradesh: Aligarh’s Gulveer Singh created history at the Commonwealth Games 2026 by winning India’s first-ever medal in the men’s 10,000-metre event. Gulveer Singh secured silver with an impressive performance pic.twitter.com/8Xggi1ikht
— IANS (@ians_india) July 29, 2026
गुलवीर सिंहने सुरुवातीला केवळ भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी धावण्यास सुरुवात केली होती. २०१८ मध्ये सैन्याच्या प्रतिष्ठित ‘ग्रेनेडियर्स रेजिमेंट’मध्ये (Grenadiers Regiment) निवड झाल्यानंतर त्याला ॲथलेटिक्समध्ये व्यावसायिकरीत्या उतरण्याची संधी मिळाली. २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १०,००० मीटर शर्यतीत कांस्यपदक, तर २०२३ च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५,००० मीटर शर्यतीत त्याने कांस्यपदक पटकावले होते.
हेही वाचा – CWG 2026 : नाशिकच्या सर्वेश कुशारेने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय
गुलवीर सिंहने राष्ट्रीय विक्रमांचा बादशाह –
🇮🇳 History created at #CWG2026!
Naib Subedar Gulveer Singh of the Indian Army clinched silver 🥈 in the men’s 10,000m final at Glasgow, becoming the first Indian ever to win a Commonwealth Games medal in the event.Born in Atrauli, Uttar Pradesh,
Naib Subedar Gulveer joined the… pic.twitter.com/EZG5IKObI2— Indian Army Sports and Adventure (@IA_SportsAdvntr) July 28, 2026
गुलवीर सिंहच्या नावावर ५,००० मीटर, १०,००० मीटर, हाफ मॅरेथॉन आणि १ मैल शर्यतीचे राष्ट्रीय विक्रम नोंदवलेले आहेत.
- २०२५: आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ५,००० आणि १०,००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक
- २०२६: हाफ मॅरेथॉन १ तासापेक्षा कमी वेळेत (५९ मिनिटे ४२ सेकंद) पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला.
- मे २०२६: अमेरिकेतील म्युझिक सिटी कार्निव्हलमध्ये ४ मिनिटांपेक्षा कमी वेळेत १ मैल शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय बनला.





