अण्णा हजारे अन् रामदेव बाबा कुठे आहेत? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल; भाजपवर निशाणा साधत म्हणाले” फक्त बोलायचा भात बोलाची कडी”

Harshvardhan Sapkal : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपमध्ये काँग्रेसच्या राजकीय नेत्यांच्या प्रवेशावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणणारे काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. कुठल्याही गोष्टीचा उत्सव करणे म्हणजे सत्ता, असे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपसाठी काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे, रामदेव बाबा आता कुठे आहे? असा सवालही सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वेादयी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून काही स्वार्थी लोक सत्तेसाठी त्यांच्याकडे जात आहे, त्याहीपेक्षा त्यांना तपास यंत्रणांची भीती दाखवून आपल्याकडे खेचून घेतले जात आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसमधून भाजपकडे जाणाऱ्यांचा समाचार सपकाळ यांनी घेतला.
तसेच समाज-समाजात तेढ निर्माण करून सत्तेची खुर्ची समाजासाठी कशी घातक आहे, यावरही सपकाळ यांनी बोट ठेवले. मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा लेखा जोखा त्यांनी मांडला पाहिजे. फक्त बोलायचा भात बोलाची कडी, असेच भाजप आणि मोदी सरकारचे धोरण असल्याची टीकाही सपकाळ यांनी यावेळी बोलताना केली.
सरकारला जाब विचारावा





