रेल्वेमंत्र्यांनी मुंबई लोकल ट्रेन दुर्घटनेवर बोलणं टाळलं; म्हणाले “जास्त बोलण्याची गरज नाही”

Mumbai Local Train Accident | मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान दोन लोकल गाड्या एका वळणावर अगदी जवळून जात असताना, दरवाज्यांजवळ लटकलेल्या प्रवाशांची बॅग एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. ट्रॅकवर पडलेल्या 13 जणांपैकी चौघांचा मृत्यू झाला असून इतर प्रवाशी जखमी आहेत.
सोमवारी (9 जून) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये जीआरपी पोलिसाचाही समावेश आहे. या घटनेनंतर विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या. मात्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर येऊन या घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मोदी सरकारच्या कार्यक्रमाला उपस्थित
सोशल मीडियावर सक्रीय असणारे अश्विनी वैष्णव यांनी मुंबई अपघातात मृत्यू झालेल्यांबद्दल सांत्वन किंवा श्रद्धांजलीही सोशल मीडियावर वाहिलेली नाही. दिल्लीत सोमवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांना मुंबईतील दुर्घटनेबद्दल विचारण्यात आले. मात्र यावर त्यांनी अधिक बोलणे टाळले. रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील अपघाताबाबत पत्रक काढले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर जास्त बोलण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. Mumbai Local Train Accident |
नेमका कसा घडला अपघात?
9 जून 2025 रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान दोन लोकल गाड्या – एक कसाराकडे जाणारी आणि दुसरी सीएसएमटीकडे जाणारी – एकमेकांच्या अगदी शेजारील ट्रॅकवरून भरधाव वेगाने जात होत्या. दरवाज्याजवळ लटकलेल्या प्रवाशांच्या पाठीवरील बॅगांचा एकमेकांना धक्का बसला, ज्यामुळे तोल जाऊन काही प्रवासी ट्रॅकवर फेकले गेले.
या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारने मुंबई लोकल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. Mumbai Local Train Accident |
मुंबईची ‘लाइफलाइन’ आता ‘डेथलाइन’ बनत चालली का?
दरम्यान, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल प्रचंड गर्दीमुळे डेथलाइन बनत चालली का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत असूनही रेल्वेकडून पावले उचलली जात नसल्यानं मुंबईकर संताप व्यक्त करत आहेत. Mumbai Local Train Accident |
हेही वाचा:





