‘द फॅमिली मॅन सीझन ३’ कधी रिलीज होणार? मनोज वाजपेयीने दिली अपडेट

The Family Man Season 3 | ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता अभिनेता मनोज वाजपेयीने या सीरिजबाबत एक नवी अपडेट दिली आहे. या सीरिजमध्ये आता जयदीप अहवालचीही एन्ट्री होणार आहे.
आतापर्यंत अनेक सीरिजच्या माध्यमातून जयदीपने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे फॅमिली मॅनमधील एन्ट्रीचीही चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यातच हा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती मनोज वाजपेयीने दिली आहे.
‘ओटीटी प्ले’शी बोलताना मनोज वाजपेयी म्हणाला, “द फॅमिली मॅन सीझन ३ या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. या सीझनमध्ये एक नवीन सदस्य शोमध्ये सामील होत असल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच. आम्ही दोन वर्षांपूर्वी जयदीप अहलावतला कास्ट केलं होतं. अलिकडेच त्यानं पाताल लोक सीझन २ मध्ये खूप चांगले काम केलं. तो ‘फॅमिली मॅन सीझन ३’ मध्ये आहे. हा सीझन खूप मोठा आणि खूप सुंदर आहे.” The Family Man Season 3 |
View this post on Instagram
दरम्यान, ‘द फॅमिली मॅन सीझन ३’ निश्चित तारीख अद्याप आलेली नाही. २०१९ मध्ये ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिज लाँच झाली होती. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्रियामणी ही मनोज वाजपेयीच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
तर शारीब हाश्मी हा त्याचा सहकारी दाखवण्यात आला आहे. या सीरिजचा दुसरा सीझन २०२१ मध्ये आला होता. दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभूने आपल्या निगेटिव्ह भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आता, तिसऱ्या सीझनची चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. राज-डीके यांची ही वेब सीरिज कॉमेडी आणि स्पाय थ्रिलरने भरलेली आहे. The Family Man Season 3 |
हेही वाचा:





