Jayant Patil : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. यामुळे राजकारण तापले असून, अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. “बारामतीत आम्ही चार पाच जण सुनेत्रा पवारांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की, काही मदत लागली तर सांगा. कोणताही किंतू मनात बाळगू नका. विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांसोबत सुरु होती तेव्हा देखील सुनेत्रा वहिनींसोबत एकदोन वेळा भेट झाली होती,” असा मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे. “सुनेत्रा वाहिनी किंवा पार्थ पवार यांच्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह आहोत. त्यांच्यासाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही,” असेही जयंत पाटील म्हणाले आहेत. जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विमान अपघात होता की घातपात यावर संशव्य व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे ठरले होते. १२ फेब्रुवारी ही तारीख देखील निश्चित करण्यात आली होती, असा दावा याअगोदर नेत्यांनी केला आहे. अजित पवार त्यासाठी आग्रही होते, असे शरद पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने सांगितले जात आहे. जयंत पाटील दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा होत असली तरी चर्चेला अंतिम रुप मिळताना दिसत नाही. या सगळ्यात जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. शशिकांत शिंदेंचे भाष्य शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांच्या श्रद्धांजलीपर लेखात विलीनीकरणावर भाष्य केले होते. प्रत्येकाने मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरण घडवून आणून पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करणे, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल असे म्हटले होते. हेही वाचा : Leopard Terror : सावधान! कोयनानगरच्या ‘या’ भागात फिरतोय जखमी बिबट्या; वन विभागाच्या दुर्लक्षाने ग्रामस्थ संतप्त