Garima Garg : ‘या अली फेम’ गायक झुबिन गर्ग यांच्या अपघाती मृत्यूची बातमी सर्वांनाच मनाला चटका लावणारी आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबिन यांचा मृत्यू झाला. या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली होती. वयाच्या ५२ वर्षी झुबिन गर्ग यांनी अकाली एक्झिट घेतली. त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांच्या निधनामुळे धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. झुबिन गर्ग यांच्या पत्नी गरिमा गर्ग यांच्या अश्रूांच्या बांध फुटला असून त्यांनी आपल्या पतीची शेवटची इच्छा काय होती याबाबत माहिती दिली आहे. बॉलिवूडला अनेक सुंदर गाणी गायक झुबिन गर्ग यांनी दिली आहेत. त्यांच्या पार्थिवावर नुकतेच आसामधील त्यांच्या मूळ गावी अत्यंसंस्कार करण्यात आले. यानंतर त्यांची पत्नी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या अनेक हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते. २३ सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे शासकीय इतमामात झुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. या दुःखाच्या प्रसंगातूनही त्यांची पत्नी गरिमा गर्ग यांनी झुबिनची शेवटची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं. सिंगापूरमध्ये मृत्यू होण्यापूर्वी झुबिन एका प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त होता. तो म्हणाला, ‘सध्या माझ्या आयुष्याचा मुख्य उद्देश हा आहे की, आम्ही ‘रोई रोई बिनाले’ या चित्रपटावर काम करणे, जो त्याचा (झुबीनचा) शेवटचा चित्रपट आहे. तो त्या चित्रपटाबद्दल खूप उत्साही होता. त्याने हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्याचं ठरवलं होतंं. म्हणून आम्ही आता या चित्रपटावर काम सुरू करू आणि त्याने दिलेल्या तारखेलाच चित्रपट प्रदर्शित करू, असं गरिमा यांनी सांगितलं. #WATCH | Guwahati | Zubeen Garg’s wife, Garima Saikia Garg, says, “The main purpose of my life is to complete the film we were working on, and it was supposed to release on 30th October. He had acted as a blind artist in this film, which features a love story. From tomorrow, we… pic.twitter.com/QB3IWQSDCW — ANI (@ANI) September 24, 2025 गरिमा पुढे म्हणाल्या, आपल्याला चित्रपटासाठी काम करावे लागेल. काहीही असो, चित्रपटाबद्दल मला फक्त एकच खंत आहे की त्याचा आवाज डबिंग झाला नाही, जे करायला हवे होते. कारण त्याने चित्रपटात देखील या चित्रपटात खूप वेगळी भूमिका साकारलेली आहे. एका अंध कलाकाराची भूमिका त्याने या चित्रपटात साकारलेली आहे. ही एक संगीतमय प्रेमकथा आहे. मला वाटतं लोकांनाही ते आवडेल, असा विश्वास गरिमा गर्ग यांनी व्यक्त केला. कोण होते झुबिन गर्ग अलिकडेच प्रसिद्ध आसामी गायिका झुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना निधन झाले. प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचा जन्म मेघालयमध्ये १९७२ साली झाला. त्यांचं खरं नाव झुबिन बोरठाकूर असं होतं. गँगस्टर या सिनेमातून त्यांनी बॅालिवूडमध्ये गायक म्हणून पदार्पण केलं. तो काळ होता २००६ चा. या सिनेमातील या अली या गाण्याने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी आसामी, बंगाली, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ‘चंदा’ (1996), ‘जलवा’ (1998), ‘यही कभी’ (1998), ‘जादू’ (1999), ‘स्पर्श’ (2000) यांसारख्या अल्बम्सना त्यांनी आवाज दिला आहे. याशिवाय ‘गद्दार’ (1995), ‘दिल से’ (1998), ‘डोली सजा के रखना’ (1998), ‘फिजा’ (2000), ‘कांटे’ (2002) यांसारख्या फिल्म्समध्ये त्यांनी गाणी गायली. हेही वाचा : “कारगिल दरम्यानही आपण पाकशी हस्तांदोलन…” ; हस्तांदोलन वादावर थरूर यांचा टीम इंडियाला सल्ला