मनोरंजन विश्वाला धक्का! ‘या अली’ फेम गायकाची अकाली एक्सिट; स्कूबा डायव्हिंगसाठी पाण्यात घेतलेली उडी ठरली अखेरची, कोण होते जुबिन गर्ग?

Zubin Garg death : मनोरंजन विश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘या अली फेम’ गायकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. गायक जुबिन गर्ग यांच सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. गायक जुबिन गर्ग यांचं वयाच्या ५२ वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या अकाली एक्सिटमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
गँगस्टर सिनेमातील त्यांचं या अली हे गाण अत्यंत लोकप्रिय झालं होतं. या गाण्यामुळे त्यांना मोठी प्रसिद्ध मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक गाणी केली. सिंगापूरमध्ये ते गायणाचे सादरणीकरण करण्यासाठी आले होते. पण थ्रिल अनुभवण्यासाठी समुद्रात घेतलेली त्यांची उडी शेवटची ठरली. त्यांच्या निधनामुळे अनेकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. ते मुळचे आसाम राज्यातील होते. आसामचे मंत्री अशोक सिंघन यांनी जुबिन गर्ग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारताने एक सर्वोत्तम कलाकार गमावला आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो, असं अशोक सिंघल यांनी एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नॉर्थ ईस्ट न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जुबिन गर्ग हे सिंगापूरमध्ये आले होते. त्यांना स्कूबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचा होता. पण ते अचानक समुद्रात पडले. त्यानंतर त्यांना वाचविण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची स्थिती बिघडली. त्यानंतर त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं, पण काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. १९ सप्टेंबर या दिवशी ते सिंगापूरमधील नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये ते सादरीकरण करणार होते.
कोण होते जुबिन गर्ग ?
प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग यांचा जन्म मेघालयमध्ये १९७२ साली झाला. त्यांचं खरं नाव झुबिन बोरठाकूर असं होतं. गँगस्टर या सिनेमातून त्यांनी बॅालिवूडमध्ये गायक म्हणून पदार्पण केलं. तो काळ होता २००६ चा. या सिनेमातील या अली या गाण्याने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी आसामी, बंगाली, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ‘चंदा’ (1996), ‘जलवा’ (1998), ‘यही कभी’ (1998), ‘जादू’ (1999), ‘स्पर्श’ (2000) यांसारख्या अल्बम्सना त्यांनी आवाज दिला आहे. याशिवाय ‘गद्दार’ (1995), ‘दिल से’ (1998), ‘डोली सजा के रखना’ (1998), ‘फिजा’ (2000), ‘कांटे’ (2002) यांसारख्या फिल्म्समध्ये त्यांनी गाणी गायली.
हेही वाचा : Pimpri Crime | दिवसाढवळ्या घरासमोर महिलेवर चाकूने वार ; मंगळसूत्र चोरी करताना चोरट्याचा जीवघेणा हल्ला





