“सामान्य माणसांनी काय करायचं? राजकीय नेत्यांकडे कसे बंगले…”; शशांक केतकरने व्यक्त केला संताप

Shashank Ketkar | मराठमोळा अभिनेता शशांक केतकरने अनेक मराठी मालिकांसह नाटकांमध्येही काम केले आहे. अनेकदा तो सोशल मीडियावर विविध विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसतो. अशातच आता शशांकने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ शेअर करत त्याने संताप व्यक्त केला आहे.
शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणतो, “मिरा रोडला मी १२ वर्षांपूर्वी एक घर घेतलंय. अजून मला ते मिळालेलं नाहीये. कारण- त्यावर सरकारचं सील आहे. कोणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू? कारण- एक तर ती बिल्डिंग पाडली जाईल आणि मला कोणीतरी बांधून देईल. काय करू? बँकेकडून अधिकृतरीत्या कर्ज घेतलं होतं. ते फेडून झालेलं आहे. पैसे भरून झालेले आहेत; पण घर मिळालं नाहीये. फक्त मुंबई, महाराष्ट्रातच नाही तर भारतात असे लाखो कॉम्प्लेक्स आहेत. जे उभे राहताना तिथे काहीतरी बेकायदा घडतंय, हे तिथल्या तिथल्या सरकारला कळत नाही? आमच्याकडून नोंदणीचे पैसे घेताना तुम्हाला हे कळत नाही? बँकांना कर्ज देताना हे कळत नाही? आमचे पैसे जातात, घर मिळत नाहीत. आता कॉमेडी करायची आहे. कोणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू? सांगा ना?” Shashank Ketkar |
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “सामान्य माणसानं काय करायचं? कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहिलं. १२ वर्षं झाली, घर बुक करून, कर्जसुद्धा फेडून झालं; पण घरचा ताबा मिळण्याची शक्यताही अजून दिसत नाहीये. सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे. दर तारखेला पुढची तारीख मिळते; पण तिथेही निकाल लागत नाही. झाडून सगळ्या राजकीय नेत्यांकडे कसे मोठे बंगले आणि अनेक गाड्या असतात? आम्हा सामान्य जनतेला हे गुपित सांगा ना! सांगा कसं जगायचं (आनंदानं, अभिमानानं व समाधानानं) तुमच्या राजकारणापायी आम्ही का-मरा?” अशी कॅप्शन देत सरकारला प्रश्न विचारला आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील कमेन्ट करत आपले अनुभव शेअर केले आहेत.
शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘हे मन बावरे’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘पाहिले न मी तुला’, ‘सोप्पं नसतं काही’ या व अशा अनेक मालिकांमध्ये काम करीत शशांकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच तो चित्रपट व वेब सीरिजमध्येदेखील दिसला आहे. सध्या तो ‘मुरांबा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करताना दिसत आहे. Shashank Ketkar |
हेही वाचा:
गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर जेजुरीच्या खंडोबाला सोन्याचे ‘जय मल्हार’ नाव भक्ताकडून अर्पण





