शशांक केतकर वाहतूक कोंडीमध्ये अडकला; संताप व्यक्त करत म्हणाला…

Shashank Ketkar Reaction On Mumbai Traffic| अभिनेता शशांक केतकरने ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’ यासारख्या अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनयासह शशांक सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा तो व्हिडीओद्वारे विविध मुद्दयांवर आपली भूमिका स्पष्ट करताना दिसतो. यातच आता शशांकला देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. याबाबत त्याने व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
शशांक केतकर शूटिंगला जाताना मुंबईतील ट्रॅफिकमध्ये अडकला. तासभर एकाच ठिकाणी गाडी बंद करून उभा राहिल्याने शशांकने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शशांकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ठाणे ते मीरा रोड दरम्यान झालेल्या ट्रॅफिकचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये सगळ्या गाड्या एकाच जागी थांबलेल्या पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये शशांकने उपहासात्मक पद्धतीने संताप व्यक्त केला.
View this post on Instagram
शशांक केतकरची संतप्त पोस्ट
शशांकने व्हिडिओमध्ये म्हंटले की, “वाह वाह… मिरारोड आणि ठाण्याच्यामध्ये लोणावळ्याचा फिल देण्यासाठी ही एक योजना आखलेली आहे. खरंतर मला यांचा हेतू कळत नाही. खर्च करून चांगले सिग्नल लावण्यापेक्षा रस्त्यात खड्डे, चुकीच्या मार्गाने येणाऱ्या गाड्या आणि वाहतूक नियमभंग यामुळे प्रत्यक्षात सिग्नल यंत्रणा एक वेगळंच काम आपण करत आहोत. ही दूरदृष्टी आपल्याकडे आहे. सिग्नलचा खर्च वाचतो, खड्ड्यांमुळे स्पीडब्रेकरचा खर्च वाचतो.”
“या सगळ्यासाठी किती वेगळी दृष्टी लागते आणि लोकांचा वेळ, जीव हे तर काय फारसं महत्त्वाचं नाही. आता सगळे लोक या कोडींमुळे पायी प्रवास करत आहेत. मलाही असंच वाटतंय की, माझी गाडी येथेच पार्क करून चालत जावे असे वाटते, कारण शूटिंगला वेळेत पोहोचावं लागेल आणि रात्री ९- १० पर्यंत या गाड्या हलतील असं वाटत नाही. तेव्हा मी गाडी इथूनच पुन्हा घेऊन जातो. वाह क्या बात है.” शशांकच्या या पोस्टनंतर अनेकांनी जनतेच्या मनातील प्रश्न उपस्थित केल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, शशांकने या प्रकरणासंदर्भात त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील काही पोस्ट शेअर केल्या आहेत. ‘बहुतेक पुढच्या पावसाळ्यापर्यंत इथेच थांबायचयं आम्ही’ असे त्याने लिहिले आहे. ही पोस्ट शशांकने मुंबई पोलीस, ठाणे पोलीस यांच्यासह मुंबई महानगरपालिकेला टॅग केले आहे.
हेही वाचा:
‘प्रभू रामाच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक पुरावा नाही’, डीएमकेच्या नेत्याच्या विधानावर भाजपा नेते संतापले





