Anjali Damania: “काय ही भाषा?”; अंजली दमानियांनी सुनेत्रा पवारांना ‘गुंगी गुडिया’ म्हणून संबोधणाऱ्या काँग्रेसला सुनावले
Anjali Damania: सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे - अंजली दमानिया

Anjali Damania: बीडमधील पत्रकार परिषदेदरम्याचा एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर जहरी टीका करण्यात आली आहे. ‘सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहतील,’ असं म्हणत काँग्रेसकडून सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar )यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री सुनेत्रा पवार या बीड दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी बीडच्या जिल्हा नियोजन बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यादरम्यान, पत्रकाराने बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला प्रश्न विचारण्यापासून रोखलं. (Anjali Damania)

Anjali Damania: “काय ही भाषा?”; अंजली दमानियांनी सुनेत्रा पवारांना ‘गुंगी गुडिया’ म्हणून संबोधणाऱ्या काँग्रेसला सुनावले
काँग्रेसची टीका (Anjali Damania)
या व्हिडिओवरून काँग्रेसने सुनेत्रा पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ‘धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा?’, तर ‘सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहतील,’ असे ट्वीट काँग्रेसकडून शेअर करण्यात आले. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुनेत्रा पवारांना ‘गुंगी गुडिया’ म्हणून संबोधणाऱ्या काँग्रेसवरच टीका केली आहे.
गुंगी गुडिया?
काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? श्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? @prithvrj
मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते. https://t.co/FfRrsbKMIj
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 3, 2026
एका पक्षाला ही भाषा शोभते का?
अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत लिहिले की, “गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादी पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे आहेत. मी याचा तीव्र शब्दात निषेध करते.” अंजली दमानिया यांनी काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ता उमेश पाटील यांनी या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी ‘गुंगी गुडिया’ असा शब्दप्रयोग केल्याची बाब अत्यंत खेदजनक असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा:





