पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? गुन्हेगारांना सोडून पोलिसांची चक्क व्यावसायिकांवर दादागिरी; Video व्हायरल !

Pune News : गुन्हेगारांना सोडून पोलीस चक्क व्यावसायिकांनाच आपल्या खाकीची दादागिरी दाखवत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर पादुका चौकातील एका हॉटेल व्यवसायिकाला पोलिसांनी मारहाण करत एखाद्या गुंडा प्रमाणे गाडीत डांबले होत. त्यानंतर आता दीप बंगला चौकातील एका व्यवसायिकाला देखील पोलिसांनी अशीच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला.
पावने अकरा ते सव्वा कराच्या कालावधीत ही मारहाण करण्यात आलेली आहे. यावेळी रेस्टॉरंट मध्ये सर्व ग्राहक उपस्थित आहेत. ग्राहकांच्या समोरच पोलीस आपली दादागिरी दाखवत आहेत. पोलीस निरीक्षक काठीने वेटर त्याचबरोबर ग्राहकांना मारत असल्याचे दिसून येत आहेत. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
हे दोन सीसीटीव्ही फुटेज आहेत एका फुटेज मध्ये पाहुणे अकरा वाजता हॉटेलचे गेट बंद करताना दिसून येत आहे. काही ग्राहक तेथे आहेत. त्यानंतर पोलीस आत मध्ये येतात. त्याच्याकडे परवान्याची विचार न करता नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंत रेस्टॉरंटला परवाना आहे. असे असताना देखील पोलीस आत मध्ये घुसूनग्राहकांच्या समोरच तेथील वेटर व इतरांना मारहाण करतात. ग्राहकांना देखील उठा इथून असे धमकावतात.





