मुंबईत नेमकं चाललंय तरी काय ? ‘रुग्णांच्या रिपोर्ट कार्डच्या खाद्यपदार्थांसाठी प्लेट्स बनवल्या’

Mumbai । माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील अत्यंत धक्कादायक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड केली आहे. रुग्णांच्या रिपोर्ट कार्डच्या प्लेट्स बनवल्या आहेत. असा आरोप त्यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थ देण्यासाठी या प्लेट्स बनवण्यात आल्याने असल्याचे म्हणत त्यांनी फोटो पोस्ट केले आहे.
हे काय चाललंय ??
प्रशासन जागे व्हा…!
एवढा अंधाधुनी कारभार करू नका @mybmc @mybmcHealthDept pic.twitter.com/6gUw6BSSGA— Kishori Pednekar (@KishoriPednekar) July 5, 2024
या प्रकरणावरून विरोधक अधिकच आक्रमक झाले असून संबंधित अधिकाऱ्याला पालिकेतून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.
किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करत या रिपोर्ट्स कार्डच्या प्लेट्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर हे काय चाललंय? प्रशासन जागे व्हा…! एवढा अंधाधुदी कारभार करू नका, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
रुग्णांचे रिपोर्ट कार्ड गोपनीय असतात. मात्र त्याचे पेपरचे प्लेट्स छापण्यात आले आहेत. यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेनंतर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला या प्रकरणाबाबतचा जाब विचारला. ज्या लोकांना ऑफिसची माहिती नाही, त्यांना जबाबदारी नाही, अशा लोकांना घरी बसवलं पाहिजे. महापालिकेचं वाटोळं करू नका. मुंबईत अरेरावी खपवून घेणार नाही, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला.
त्या पुढे म्हणाल्या,’पालिकेचे अधिकारी सुधाकर शिंदे आल्यापासून मुंबईची वाट लावली आहे. आधी त्यांना हाकला. त्यांचं वय उलटून गेलं आहे. त्यांनाही वारंवार एक्स्टेनशन दिलं जात आहे. त्यांच्या मागे कोण आहे? कुणाच्या तरी आश्रयाने ते बसले आहेत. त्यांना आधी हद्दपार करा, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.





