जिओकॉइन नक्की काय आहे? रिलायन्सची क्रिप्टोकरन्सीमध्ये एन्ट्री? वाचा

JioCoins Cryptocurrency: बिटकॉइन्स, इथेरियम, डॉज कॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी जागतिक बाजारात लोकप्रिय आहेत. लाखो लोकं क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून व्यवहार करताना पाहायला मिळतात. त्यातच आता भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने देखील क्रिप्टोमध्ये एन्ट्री घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर जिओकॉइन नावाने या क्रिप्टोकरन्सीची जोरदार चर्चा सुरू आहे.
नुकतेच जिओ प्लॅटफॉर्म्सने इंटरनेट टेक्नोलॉजी कंपनी पॉलीगॉन लॅब्ससह भागीदारीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर जिओ कॉइनच्या चर्चेने जोर पकडला आहे. सोशल मीडियावर याचे फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. मात्र, कंपनीकडून अद्याप याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर जिओ कॉइनची चर्चा
रिलायन्स जिओने Jiocoin प्रोग्राममध्ये Web3 तंत्रज्ञान जोडण्यासाठी पॉलिगॉनसोबत भागीदारी केली आहे. Web3 तंत्रज्ञानाच्या मदतीने यूजर्सचा डेटा अधिक चांगल्या पद्धतीने सुरक्षित ठेवण्यास मदत होते. याशिवाय, ब्लॉकचेन, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स, डिजिटल एसेट्स, क्रिप्टोकरन्सी, केंद्रीय बँक डिजिटल कॉइन्स(CBDC) आणि NFT सारख्या नवीन तंत्रज्ञानासाठी Web3 चा वापर केला जातो. त्यामुळे जिओ आणि पॉलीगॉन लॅब्सने भागीदारी केल्याची माहिती समोर आल्यापासून जिओकॉइनची चर्चा सुरू झाली आहे.
🇮🇳Big Breaking News:- Jiocoin Launched On Polygon.
Reliance Jio, the world’s largest mobile operator, has just surprised the crypto world by officially launching Jiocoins!
What are Jiocoins?
Jiocoins are digital tokens issued on Polygon.Jiocoins is a mechanism to reward… pic.twitter.com/MNRb5HGa08
— Kashif Raza (@simplykashif) January 16, 2025
बिटिनिंगचे सीईओ काशिफ रझा यांनी देखील एक्सवर (ट्विट) पोस्ट करत पॉलिगॉनवर जिओकॉइन लाँच करण्यात आल्याचे म्हटले आहे. सोबतच, त्यांनी यूजर्सला जिओकॉइन्स कशाप्रकारे मिळू शकेल व याचा वापर कशासाठी करता येईल, याची माहिती दिली आहे.
जिओकॉइन्ससाठी यूजर्सला जिओस्पेअर इंटरनेट ब्राउजरचा वापर करावा लागेल. या ब्राउजरचा वापर केल्यानंतर पॉलिगॉन वॉलेटमध्ये जिओकॉइन जमा होतील. या कॉइन्सचा उपयोग भविष्यात मोबाइल रिचार्ज करण्यासाठी, रिलायन्स गॅस स्टेशनवर खरेदीसाठी करता येईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.





