Jio New Recharge Plan | नवीन चित्रपट-सीरिज, आयपीएलचा आनंद घेण्यासाठी तुमच्याकडे जिओहॉटस्टारचे सबस्क्रिप्शन असणे गरजेचे आहे. जिओने काही दिवसांपूर्वीच नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टार लाँच केले आहे. तुम्ही दरमहिना ठराविक रक्कम भरून या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. याशिवाय, तुमच्याकडे जिओचे सिम कार्ड असल्यासही फायदा मिळू शकतो. जिओने काही दिवसांपूर्वीच 195 रुपयांचा स्वस्त जिओहॉटस्टार प्लॅन लाँच केला होता. आता कंपनीने यापेक्षा स्वस्त सबस्क्रिप्शन रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनीने फक्त 100 रुपये किंमतीचा नवीन डेटा पॅक लाँच केला आहे. जिओचा 100 रुपयांचा प्लॅन जिओने क्रिकेट आणि एंटरटेन्मेंट प्रेमींना मोठे गिफ्ट दिले आहे. कंपनीने अवघ्या 100 रुपयांचा रिचार्ज पॅक लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिसांसाठी JioHotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. सोबतच, 5 जीबी डेटा दिला जातो. हा एक केवळ डेटा प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला एसएमएस किंवा कॉलिंगची सुविधा मिळत नाही. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बेस प्लॅन असणे गरजेचे आहे. 5 जीबी डेटा समाप्त झाल्यानंतर तुम्ही 64 Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. या सबस्क्रिप्शनच्या मदतीने तुम्ही चित्रपट, सीरिज, आयपीएल 2025 चा 1080p रिझॉल्यूशनमध्ये आनंद घेऊ शकता. दरम्यान, कंपनीने जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शनसाठी तीन प्लॅन्स लाँच केले आहेत. यामध्ये मोबाईल, सुपर व प्रीमियम अशा प्लॅन्सचा समावेश आहे. या प्लॅनची किंमत महिन्याला 149 रुपयांपासून ते वर्षाला 1499 रुपयांपर्यंत आहे.