Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीत कोण मारणार बाजी? ६ संघ ५ सामन्यांमध्ये आमनेसामने, वेळापत्रकासह जाणून सर्व काही

Duleep Trophy 2025 Schedule : भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा दुलीप ट्रॉफी 2025 ची सुरुवात 28 ऑगस्टपासून होणार आहे. यंदा या स्पर्धेत 6 संघ सहभागी होत असून, स्पर्धा पुन्हा जुन्या स्वरूपात परतली आहे. गेल्या वर्षी भारतीय संघातील स्टार खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता, परंतु यंदा पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमधील उगवते खेळाडू आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहेत.
दुलीप ट्रॉफीचा इतिहास आणि महत्त्व –
1960 मध्ये सुरू झालेली दुलीप ट्रॉफी देशांतर्गत क्रिकेटपटूंना मोठा मंच प्रदान करते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या स्पर्धेद्वारे नवोदित खेळाडूंना संधी देते आणि त्यांच्या कौशल्याला वाव मिळवून देते.
स्पर्धेचे स्वरूप –
Ready, set, cricket! 🏏
New Domestic Season, renewed energy, fresh battles – it all starts with the #DuleepTrophy 🙌
Follow all the live scores only on https://t.co/pQRlXkBIEE 💻 and the BCCI Official Apps 📱@IDFCFIRSTBank pic.twitter.com/y3501wpuUw
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 27, 2025
यंदा सहा संघांपैकी साउथ झोन आणि वेस्ट झोन हे दोन संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. तर नॉर्थ झोन, ईस्ट झोन, सेंट्रल झोन आणि नॉर्थ ईस्ट झोन यांचा प्रवास क्वार्टरफायनलपासून सुरू होईल. या सहा संघांमध्ये आशिया कपसाठी निवडलेले चार खेळाडू – तिलक वर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि कुलदीप यादव देखील खेळणार आहेत.
प्रमुख खेळाडूंचा सहभाग –
The battle for zonal supremacy returns! 💪
6️⃣ Zones, 1️⃣ Cup 🏆
Check out the #DuleepTrophy fixtures and mark your calendars for some exhilarating cricketing action 🔜 🗓️@IDFCFIRSTBank pic.twitter.com/1jKxJkRpgY
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 27, 2025
वेस्ट झोनच्या संघात श्रेयस अय्यर, सर्फराझ खान, यशस्वी जैसवाल, शार्दुल ठाकुर आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासारखे स्टार खेळाडू असतील. सेंट्रल झोनच्या संघात कुलदीप यादव, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल आणि दीपक चाहर खेळतील. साउथ झोनचे नेतृत्व युवा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा करेल, तर 100 हून अधिक प्रथम श्रेणी सामने खेळलेला अभिमन्यू ईश्वरन ईस्ट झोनचा कर्णधार असेल.
दुलीप ट्रॉफीचे संघ आणि त्यांचे कर्णधार –
दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा संगम पाहायला मिळणार असून, ही स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या स्पर्धेत शार्दुल ठाकुर (वेस्ट झोन), ध्रुव जुरेल (सेंट्रल झोन), तिलक वर्मा (साऊथ झोन), अभिमन्यू ईश्वरन (ईस्ट झोन), अंकित कुमार (नॉर्थ झोन) आणि जोनाथन रोंगसेन (नॉर्थ ईस्ट झोन) चे नेतृत्व करताना दिसणार आहेत.
दुलीप ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक (सर्व सामने बेंगळुरूमध्ये खेळले जातील) :
- क्वार्टर-फायनल १, २८-३१ ऑगस्ट: उत्तर विभाग विरुद्ध पूर्व विभाग, सकाळी ९:३० वाजता
- क्वार्टर-फायनल २, २८-३१ ऑगस्ट: मध्य विभाग विरुद्ध उत्तर पूर्व विभाग, सकाळी ९:३० वाजता
- सेमी-फायनल १, ४-७ सप्टेंबर: दक्षिण विभाग विरुद्ध टीबीसी, सकाळी ९:३० वाजता
- सेमी-फायनल २, ४-७ सप्टेंबर: पश्चिम विभाग विरुद्ध टीबीसी, सकाळी ९:३० वाजता
- फायनल सामना, ११-१५ सप्टेंबर: टीबीसी विरुद्ध टीबीसी, सकाळी ९:३० वाजता





