‘नक्की मजबुरी तरी काय?’; अमिताभ बच्चन यांच्यावर नेटकरी संतापले

Amitabh Bachchan | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने देखील ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तानचे हल्ले उलथवून लावले आहेत. या सगळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय सैनिकांचं कौतूक करत आहेत. मात्र यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी केलेल्या ट्वीटमुळे त्यांना ट्रोल करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारे बिग बी हे सध्या देशभरात सुरू असलेल्या मोठ्या घडामोडींबाबत केवळ ब्लँक पोस्ट लिहित आहेत. यामुळे चाहते त्यांच्यावर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियार ब्लॅक पोस्ट केली आहे. रोज रात्री 1 ते 2 सुमारास ते ब्लॅक ट्विट करतात. अमिताभ यांनी 22 एप्रिलला शेवटच ट्विट केलं होतं. ज्यामध्ये मजकूर लिहिलेला होता. त्यानंतर ते दररोज फक्त पोस्टमध्ये ट्विटचा आकडा लिहित आहेत.
पहलगाम हल्ला झाला आणि अमिताभ यांनी शांत राहण्याचा मार्ग निवडला. देशभरात तणावाचं वातावरण असताना, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना बिग बी मात्र एक्स अकाऊंटवर फक्त ब्लँक पोस्ट लिहित आहेत. यावर नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. Amitabh Bachchan |
अमिताभ बच्चन यांच्याया पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे मूक ड्रील कधीपर्यंत सुरू राहणार’, ‘आता तरी काही बोला’, ‘नक्की मजबुरी तरी काय आहे?’ अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. याशिवाय ‘पहलगाम हल्ल्यावर संपूर्ण देश व्यक्त होत असताना तुम्ही किमान दोन शब्द लिहू शकत नाही का?’, असा संतप्त सवालही नेटकऱ्यांनी केला आहे. Amitabh Bachchan |
हेही वाचा:
अखेर या निर्मात्याला ‘अॅापरेशन सिंदूर’ टायटल मिळालं; चित्रपटाचं पहिलं लक्षवेधी पोस्टर समोर






