Konkona Sen Sharma : आई झाल्यावर इंडस्ट्रीत काम मिळण्यावर काय परिणाम होतो; अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने स्पष्टचं सांगितलं, काय म्हणाली पाहा…

Actress Konkona Sen Sharma : अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. विविध मुद्यांवर आपले प्ररखड मत ती नेहमी मांडत असते. नुकतेच तिने एका मुलाखती दरम्यान इंडस्ट्रीतील महिला कलाकर आई झाल्यानंतर त्यांच्या कामावर त्याचा काय परिणाम होतो, यावर भाष्य केले आहे.
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा तिच्या ‘मेट्रो दिस डेज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त असून, तिने आई झाल्यानंतर इंडस्ट्रीतील महिलांना येणाऱ्या आर्थिक अडचणींबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. नुकतीच फर्स्टपोस्टशी झालेल्या मुलाखतीत कोंकणा सेन शर्मा हिने, खरं सांगायचं तर, आजच्या काळात कोणत्याही उद्योगात महिला आई झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येतो. तर पुरुषांच्या बाबतीत हे उलट घडते, असे ती म्हणाली आहे.
ज्यावेळी पुरुष मुलाचा बाप होतो, त्यावेळी तो अधिक कमाईच्या मागे धावू लागतो. पण महिलांच्या बाबतीत ही गोष्ट उलटी होते. याचे कारण म्हणजे आई झाल्यानंतर महिलांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. तसेच तिच्यासमोर अनेक आव्हान येत असतात. तिला प्रत्येक गोष्टीत सहभागी होता येत नाही. अभिनेत्री पुढे म्हणाली, व्यावसायिक जीवनात सक्रिय राहणे आणि त्याच वेळी एक चांगली आई बनने हे अधिकाधिक कठीण होत चालले आहे, असे स्पष्ट मतही कोंकणाने व्यक्त केले.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, कोंकणा ही अनुराग बसूच्या ‘मेट्रो दिस डेज’ या चित्रपटाचा एक भाग आहे. हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात कोंकणाच्या व्यतिरिक्त अभिनेता पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फजल, अनुपम खेर, फातिमा सना शेख आणि नीना गुप्ता हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा : मराठी मालिकेत होणार विद्या बालनची एन्ट्री; खास भूमिकेत दिसणार





