मराठी मालिकेत होणार विद्या बालनची एन्ट्री; खास भूमिकेत दिसणार

Vidya Balan | ‘झी मराठी’वर सुरू होणाऱ्या नव्या मालिकेत बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनची एन्ट्री होणार आहे. ‘कमळी’ या मालिकेचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. यात मुख्य भूमिकेत विजया बाबर दिसणार आहे. सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या मालिकांमध्ये अभिनेत्री मालिकेचं प्रमोशन करत आहे.
परंतु आता मालिकेत ‘कमळी’ची शिक्षिका म्हणून थेट बॉलिवूडची सुपरस्टार विद्या बालन दिसणार आहे. शिक्षणाची ओढ असलेल्या खेडेगावात राहणाऱ्या आणि मोठी स्वप्न पाहणाऱ्या कमळीला विद्या बालन शिक्षणाचे आणि व्यवहार ज्ञानाचे धडे देणार आहे. नुकताच वाहिनीनं मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये विद्या बालन कमळीला काही प्रश्न विचारताना दिसत आहे.
सुरुवातीला प्रोमोमध्ये विनोदी अंदाज पाहायला मिळत आहे. या प्रोमोला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांना विद्याचा मराठमोळा अंदाज फारच पसंतीस पडला आहे.
View this post on Instagram
विद्या बालनने आपल्या कारकीर्दिला टेलिव्हिजनपासूनच सुरुवात केली. अशोक सराफ स्टार ‘हम पांच’ या गाजलेल्या मालिकेतून विद्या बालननं मनोरंजन विश्वास पदार्पण केलं. त्यानंतर विद्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण, आता विद्या बालन एका मराठी मालिकेत दिसणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा:





