Sunstroke : ‘सनस्ट्रोक’ म्हणजे नेमकं काय? उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल? वाचा…
जास्त उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, त्वचेचे आजार आणि विशेषतः सनस्ट्रोक (उन्हाचा झटका) होण्याची शक्यता वाढते.

Sunstroke : उन्हाळा सुरू होताच तापमान झपाट्याने वाढते आणि शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. जास्त उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, त्वचेचे आजार आणि विशेषतः सनस्ट्रोक (उन्हाचा झटका) होण्याची शक्यता वाढते.
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातून घाम जास्त प्रमाणात येतो. यामुळे शरीरातील पाणी आणि खनिजे कमी होतात. परिणामी पुढील समस्या निर्माण होऊ शकतात- थकवा आणि अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या किंवा मळमळ, त्वचेवर पुरळ, खाज किंवा फंगल इन्फेक्शन. Sunstroke
सनस्ट्रोक म्हणजे काय? Sunstroke
जेव्हा शरीराचे तापमान अचानक खूप वाढते आणि शरीर स्वतःला थंड ठेवू शकत नाही, तेव्हा सनस्ट्रोक (Sunstroke) होतो. अश्यावेळी तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, जास्त तहान लागणे, शरीर खूप गरम होणे, मळमळ किंवा उलटी, घाम कमी होणे किंवा अचानक थांबणे असे लक्षणे दिसून येतात.
सनस्ट्रोकपासून बचावासाठी उपाय : Sunstroke
– सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा
– बाहेर जाताना टोपी, सनग्लासेस आणि कापडी स्कार्फ वापरा
– हलके आणि सुती कपडे परिधान करा
– दिवसातून 2.5 ते 3 लिटर पाणी प्या
– नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यांचा आहारात समावेश करा
– बाहेरून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नये, थोडा वेळ विश्रांती घ्या
– उन्हाळ्यात त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण
– उन्हाळ्यात घामामुळे त्वचा ओलसर राहते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन, पुरळ, खाज, घामोळ्या यांचा धोका वाढतो.
त्वचेची काळजी घेण्यासाठी उपाय : Sunstroke
– दिवसातून दोन वेळा आंघोळ करा
– सुती आणि सैल कपडे वापरा
– घाम पुसून त्वचा कोरडी ठेवा
– तेलकट, तळलेले पदार्थ कमी खा
– शरीरात पाण्याची कमतरता नको
उन्हाळ्यातील कार्यक्षम अन्न : Sunstroke
उन्हाळ्यात काही नैसर्गिक अन्नपदार्थ शरीराला थंडावा देतात, शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतात आणि ऊर्जा टिकवून ठेवतात.
1. डिटॉक्स वॉटर
डिटॉक्स वॉटर म्हणजे पाण्यात नैसर्गिक फळे आणि औषधी वनस्पती मिसळून तयार केलेले पेय.
फायदे : शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकते, शरीर हायड्रेट ठेवते , त्वचा तजेलदार ठेवते, पचन सुधारते
उदाहरण, पाण्यात लिंबू, काकडी आणि पुदिन्याची पाने घालून दिवसभर प्या.
2. चिया सीड्स
चिया सीड्समध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात.
फायदे : शरीराला थंडावा देतात, पचन सुधारतात, ऊर्जा वाढवतात, वजन नियंत्रणात ठेवतात
कसे घ्यावे : 1 चमचा चिया सीड्स पाण्यात किंवा ताकात भिजवून प्या.
3. सब्जा सीड्स
सब्जा बिया शरीर थंड ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.
फायदे : शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात, अॅसिडिटी कमी करतात, पचन सुधारतात, सनस्ट्रोकपासून संरक्षण करतात
कसे घ्यावे : 1 चमचा सब्जा बिया 10 मिनिटे पाण्यात भिजवून लिंबूपाण्यात घालून प्या.
4. पुदिना : पुदिन्याला नैसर्गिक कूलिंग गुणधर्म आहेत.
फायदे : पचन सुधारते, शरीराला थंडावा देते, ताजेतवाने वाटते, अॅसिडिटी कमी करते
कसे घ्यावे : पुदिन्याची चटणी, पुदिना पाणी किंवा ताकात वापरता येतो.
5. लिंबू : लिंबू हे व्हिटॅमिन सी चे उत्तम स्रोत आहे.
फायदे : रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवते, पचन सुधारते, शरीराला ऊर्जा देते
कसे घ्यावे : लिंबूपाणी किंवा डिटॉक्स वॉटरमध्ये वापरा.
उन्हाळ्यात आरोग्यासाठी टिप्स :
– दिवसाची सुरुवात कोमट पाणी किंवा डिटॉक्स वॉटरने करा
– दर दोन तासांनी थोडे पाणी प्या
– जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळा
– हंगामी फळे आणि भाज्या आहारात समाविष्ट करा
– पुरेशी झोप आणि हलका व्यायाम करा
– आहारतज्ज्ञ वैष्णवी ठिगळे
हे देखील वाचा :
Summer : उन्हाळ्यात फ्रिज वापरताना ‘या’ चुका टाळा; नाहीतर अन्नासह आरोग्यालाही होईल मोठा धोका






