काय सांगता! ‘जोकर 2’साठी वॉकिंग फिनिक्सला दिले तब्ब्ल एवढे कोटी

मुंबई – तिकीट बारीवर अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या सुपरहिट “जोकर’या खलनायकपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हॉलिवूड चित्रपटसृष्टीत सर्वोकृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून “जोकर’ चित्रपटाचा ओळखले जाते. ऑस्कर 2020 मध्ये या चित्रपटाला वेगवेगळी अशी 11 नामांकने मिळाली होती.
या चित्रपटात सुपरस्टार “वॉकिंग फिनिक्स’ यानं जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. दरम्यान, लक्षवेधी बाबा म्हणजे ‘जोकर 2’ या चित्रपटासाठी वॉकिंग फिनिक्सला तब्बल 367 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचं कळतंय.
वॉकिंग फिनिक्सने आजवर कधीही एकाच फ्रेंचाईजीच्या मूव्ही सीरिजमध्ये काम केलेलं नाही. किंबहूना केवळ एकच चित्रपट करुन हा अभिनेता फ्रेंचाईजी सोडून देतो. परंतु जोकरसाठी मात्र त्याने आपला हा नियम मोडण्यास होकार दिला आहे.
टॉड फिलिप्सच्या दिग्दर्शनात बनलेला हॉलिवूड चित्रपट ‘Joker’ 2019 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला भारतातही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.





