काय सांगता…! पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला खुलासा

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर सॉफ्ट पॉर्नोग्राफी चित्रपट बनविल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अटक केली आहे.
राज कुंद्रावर सॉफ्ट पॉर्न चित्रपट बनविण्यासह तो ऍपवर अपलोड करण्याचाही आरोप करण्यात आला आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
या प्रकरणानंतर सोशलवर सध्या याच मुद्यांना धरून अनेक चर्चाना उधाण आले आहे. कुठल्या राज्यातील पॉर्न पाहणारे लोक जास्त आहे. कुठे प्रमाण कमी आहे. अशा अनेक प्रश्नांचे उत्तर नेटकऱ्यांकडून सर्च केले जात आहे.
यातच यूरोपियन फेडरेशन ऑफ सेक्सोलॉजीने केलेल्या एका स्टडीमध्ये अशी माहिती समोर आले आहे की,’ विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण जास्त आहे.’ संबंधित स्टडी चा अहवाल हा सेक्सोलॉजीस’मध्ये प्रसिद्धही करण्यात आला आहे.
दरम्यान, पॉर्न बघण्याचे प्रमाण आजवर तरुण आणि अविवाहित व्यक्तीमध्ये जास्त असते असे गृहीत धरले जात असे मात्र या अहवालामुळे पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे.





