पत्नी मीरासोबत शाहिद कपूरने केले असे काही की चाहते म्हणाले,’नवरा असावा तर असा..!’

मुंबई – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उद्घाटन समारंभातील व्हिडिओची चर्चा सध्या सर्वत्र आहे. या कार्यक्रमात ‘सिव्हिलायझेशन टू नेशन: द जर्नी ऑफ अवर नेशन’ हे संगीत नाटक झाले. इंडिया इन फॅशन नावाचे ड्रेस एग्जिबिशन आणि संगम कॉन्फ्लुएन्स नावाचा समूह शो देखील झाला. यामध्ये अनेक सेलेब्स सहभागी झाले होते, ज्यामध्ये मीरा राजपूत आणि शाहिद कपूर देखील दिसले होते. शाहिदच्या एका कृतीने लोकांची मने जिंकली.
View this post on Instagram
बॉलीवूडचे पॉवर कपल शाहिद कपूर आणि मीरा राजपूत देखील हातात हात घालून आले आणि त्यांनी कॅमेर्यासाठी पोज दिले होते. शाहिद स्टायलिश ब्लॅक सूटमध्ये दिसला होता आणि तो सुपर हँडसम दिसत होता. तर मीरा गाऊन आणि ग्लॅम मेकअपमध्ये मोहक दिसत होती. तसेच जेव्हा मीरा आली तेव्हा शाहिदने तिच्या कपड्यांची काळजी घेतली आणि तीला कॅमेरा पुढे पोज देतांना तिला कपडे नीट करण्यात मदत केली. त्याची ही कृती सोशल मीडियावर लोकांची मने जिंकत आहे. शाहिद हे करत असताना मीरा त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहत होती. दोघांमधील असे नाते पाहून लोक त्यांचे कौतुक करत आहेत आणि शाहिदला खरा सज्जन, जेंटल मन, देखील म्हणत आहेत.
ईशा NMACC बद्दल बोलली आणि म्हणाली, ‘माझी आई नीता अंबानी यांना कला, संस्कृती आवड आहे. प्लॅटफॉर्म जे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे, कलाकारांचे, आणि क्रिएटिव्हचे स्वागत करेल. NMACC साठी त्यांची दृष्टी भारताने जगाला देऊ केलेले सर्वोत्कृष्ट दाखवणे आणि जगाला भारतात आणणे आहे.’





