Sooraj Barjatya : करीना आणि अभिषेकने असं काय केलं? बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शकाचा खुलासा म्हणाले “ते दोघेही…”
Sooraj Barjatya : आता बऱ्याच काळाच्या ब्रेकनंतर त्यांचा 'ये प्रेम मोल लिया' हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Sooraj Barjatya : चित्रपट दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी बॅालिवूडला कौटुंबिक चित्रपटांची गोडी लावली. त्यांनी दिग्दर्शिक केलेल्या चित्रपटांमध्ये नेहमीच कौटुंबातील नात्यांवर भाष्य करण्यात आले. या दिग्दर्शकाने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत केवळ आठ चित्रपट केले. आता बऱ्याच काळाच्या ब्रेकनंतर त्यांचा ‘ये प्रेम मोल लिया’ हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सूरज बडजात्या यांनी ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’च्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्यामुळे आपला राग कसा अनावर झाला होता, याचा एक किस्सा त्यांनी शेअर केला.
सूरज बडजात्या यांनी सिद्धार्थ कन्ननसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, ‘मैं प्रेम की दीवानी हूँ’च्या सेटवर त्यांना एकदा खूप राग आला होता. सूरज म्हणाले की, त्यांना सेटवर अभिषेक आणि करीनामुळे राग आला होता. “ते दोघेही खूप गोड स्वभावाचे आहेत. ते मला खूप आवडतात, पण ते खूप खोडकर होते.”
“जेव्हा कधी ते सेटवर भेटायचे, तेव्हा ते मला सराव करण्याची एकही संधी देत नसत; ते सतत मस्करी करत असत. अभिषेक खूप खोडकर आहे. त्यावेळी मला नीट झोप लागली नाही. मी खूप कमी वेळ झोपलो, म्हणून मी माझा मायक्रोफोन त्यांच्यावर फेकला.” अशी आठवण सूरज बडजात्या यांनी सांगितली.
‘मैं प्रेम दीवानी’ हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन, करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
ये प्रेम मोल लिया चित्रपटाने किती कमाई केली?
‘ये प्रेम मोल लिया’ हा चित्रपट २७ नोव्हेंबर या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई गोळा केली आहे. या चित्रपटाने देशभरातून दोन दिवसांत १८. ७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४ कोटींचे नेट कलेक्शन गोळा केले आहे. त्यामुळे आता वीकेंडनंतर चित्रपटाची एकूण कमाई कुठेपर्यंत मजल मारते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
Dapodi : दापोडी परिसरात दूषित पाणीपुरवठा; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा





