SRH vs PBKS : मैं कहीं नहीं गया…! शतक झळकावताच अभिषेकने चिट्ठी दाखवत पंजाबला डिवचलं? पाहा VIDEO

SRH vs PBKS What did Abhishek Sharma write in the letter he showed after his century : आयपीएल २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा विध्वंसक अवतार अखेर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अभिषेक शर्माच्या विक्रमी शतकाच्या जोरावर हैदराबादने पंजाबचा ८ विकेट्सने पराभव करून हंगामातील त्यांचा दुसरा विजय नोंदवला. अभिषेकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक अवघ्या ४० चेंडूत पूर्ण केले. या शतकानंतर त्याने जबरदस्त सेलिब्रेशन केले. दरम्यान त्याने एक चिट्ठी दाखवली, जिची सर्वत्र चर्चा होत आहे. त्या चिट्ठीत नक्की काय लिहलं होतं? जाणून घेऊया.
त्या चिट्ठीत काय लिहिलं होतं?
अभिषेक शर्माने ४० चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकार मारत आपले आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. या पहिल्यावहिल्या वादळी शतकानंतर त्याने जबरदस्त जबरदस्त सेलिब्रेशन केले. या दरम्यान त्याने खिशातून एक चिट्ठी काढली आणि सर्वांना दाखवून अभिवादन केले आहे. या चिट्ठीत लिहिलं होतं की, ‘हे शतक ऑरेंज आर्मीसाठी आहे.’ आता या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने हैदराबादसमोर तब्बल २४६ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात हैदराबादने १८.३ षटकांत २ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला.
https://twitter.com/incricketteam/status/1911107574885130268
𝘼 𝙣𝙤𝙩𝙚-𝙬𝙤𝙧𝙩𝙝𝙮 𝙏𝙊𝙉 💯
A stunning maiden #TATAIPL century from Abhishek Sharma keeps #SRH on 🔝 in this chase 💪
Updates ▶ https://t.co/RTe7RlXDRq#TATAIPL | #SRHvPBKS | @SunRisers pic.twitter.com/ANgdm1n86w
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2025
अभिषेक शर्माने ५५ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकार मारले –
यापूर्वी, अभिषेक शर्माला या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून धावा काढण्यात संघर्ष करताना पाहिले गेले होते, परंतु सनरायझर्ससाठी त्याच्या घरच्या मैदानावर, अभिषेकने योग्य वेळी आपला फॉर्म परत मिळवला आणि संघासाठी एक शानदार शतकी खेळी खेळली. यादरम्यान, अभिषेक शर्माने ट्रॅव्हिस हेडसह पहिल्या विकेटसाठी १७१ धावांची विक्रमी भागीदारी केली. सनरायझर्सकडून ३७ चेंडूत ६६ धावा काढल्यानंतर ट्रॅव्हिस हेड बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा ५५ चेंडूत १४ चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर १४१ धावांची विक्रमी खेळी साकारून बाद झाला.
हेही वाचा – SRH vs PBKS : मैदानातच चेंडू हरवल्यामुळे गोंधळला इशान किशन, नक्की काय घडलं? पाहा VIDEO
याआधी पंजाब किंग्जनेही आपल्या तुफानी फलंदाजीने खूप धुमाकूळ घातला होता. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार अय्यरने स्वतः फलंदाजीत खळबळ उडवून दिली आणि स्फोटक अर्धशतक झळकावले. पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. याशिवाय, गेल्या सामन्यातील शतकवीर प्रियांश आर्यनेही १३ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले.





