Anuradha Paudwal : “LGBTQ समाजासाठी काय योगदान देतात?”; अनुराधा पौडवाल यांच्या विधानामुळे वाद; नेटकऱ्यांची टीका
Anuradha Paudwal : सोशल मीडियावरील अनेक युझर्सना अनुराधा पौडवाल यांचे विधाने पसंत पडलेले नाही.

Anuradha Paudwal : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी एका पॉडकास्टमध्ये LGBTQ समुदाय, विवाह याबद्दल विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. समलैंगिक हक्कांमुळे विवाह संस्थेला तडा गेला आहे आणि ती कमकुवत झाली आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर एकच वाद पेटला असून अनेकांनी अनुराधा पौडवाल यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे
एका मुलाखतीत, अनुराधा पौडवाल यांना, गेल्या काही वर्षांत भारतातील विवाह संस्था कमकुवत झाली आहे असे वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “विवाहाला पूर्वी जे पावित्र्य होते, ते आता राहिलेले नाही. याचे कारण LGBTQ समुदायाला देण्यात आलेल्या अधिकारांमध्ये दडलेले आहे. ते समाजासाठी काय योगदान देतात? मला हे जाणून घ्यायचे आहे. ते नक्की कोणत्या प्रकारे योगदान देत आहेत? Anuradha Paudwal
View this post on Instagram
जेव्हा एखादा पुरुष आणि स्त्री विवाह करतात आणि कुटुंब सुरू करतात, तेव्हा ते ठीक असते, ते योग्य पद्धतीने करत असतात. पण LGBTQ मुळे समाजाच्या कल्याणात काय भर पडते? कदाचित माझ्याकडून काहीतरी गोष्ट राहून गेली असेल, पण ते नक्की समाजासाठी कसे योगदान देत आहेत?” असे विधान अनुराधा यांनी केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील अनेक युझर्सना गायिकेची विधाने पसंत पडलेले नाही. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
अनुराधा यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर
एका व्यक्तीने लिहिले, “ते कायदेशीररीत्या विवाह करण्यास आणि विषमलिंगी व्यक्तींनी सोडून दिलेल्या मुलांना कायदेशीररीत्या दत्तक घेण्यास तयार असतात. यातच सर्व काही आले.” दुसऱ्या एका युझरने लिहिले, “खरे तर, आपण त्या समलिंगी व्यक्तींचे आभारी असायला हवे, ज्यांनी ही लोकसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यास मदत केली आहे.” Anuradha Paudwal
तर आणखी एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले, “हे अगदी तसेच आहे जसे तुम्ही ‘भजन’ गाता आणि काही गायक ‘रॉक’ किंवा ‘मेटल’ संगीत सादर करतात. पण केवळ तुम्ही ‘रॉक’ संगीत गात नाही म्हणून तुम्हाला ‘संगीतातील तुमचे योगदान काय आहे?’ असे विचारणे विचित्र वाटणार नाही का?”, असे म्हणत अनेकांनी अनुराधा यांच्या विधानावर टीका केली आहे. तसेच एकाने लिहिले, “कृपया या विषयावर आधी स्वतः पुरेशी माहिती मिळवा.” Anuradha Paudwal
हेही वाचा :





