काय सांगता! पुण्यातील या उद्योगपतीने खरेदी केली तब्बल 22 कोटींची अलिशान कार
Updated On:

Businessman Yohan Poonawalla | जगातील सर्वांत महागडी गाडी म्हणून रोल्स रॅायस या गाडीकडे पाहिले जाते. अनेक उद्योपतींकडून ही महागडी आहे. तर अनेक बड्या उद्योगपतींचे ही अलिशान कार घेणे हे स्वप्न असते. पण पुण्यातील एका उद्योगपतीने चक्क या अलिशान कारचा संग्रह केला आहे. आता या उद्योगपतीने आणखी रोल्स रॅायल अलिशान आणि अत्यंत महागडी कार खरेदी केली आहे.
महाराष्ट्रात रोल्स रॅायल ही अलिशान उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी यांच्याकडे आहे. याशिवाय अनेक बड्या उद्योगपतींकडे ही कार आहे. या सर्वांना मागे टाकत योहान पूनावाला यांनी तब्बल २२ कोटींची रोल्स रॅायल ही अलिशान गाडीचे फँटम VIII EWB हे व्हेरियंट खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कारच्या संग्रहात आणखी एक रोल्स रॅायल कारचा समावेश झाला आहे.
योहान पुनावाला हे पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती असून कार प्रेमी आहेत. त्यांनी आपल्या आलिशान कार संग्रहात तब्बल २२ कोटी रुपये किंमतीची नवीन रोल्स रॅायस फँटम VIII EWB ही कार समाविष्ट केली आहे. ही कार त्यांच्या संग्रहातील २२ वी रोल्स-रॉयस आहे, ज्यामुळे त्यांनी अनेक उद्योगपतींना मागे टाकल्याचे बोलले जाते. योहान पूनावाला हे भारतातील सर्वात प्रसिद्ध कार संग्राहकांपैकी एक मानले जातात.
योहान यांनी आतापर्यंत अनेक दुर्मिक आणि महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत. ज्यात ७ कोटी रुपये किंमतीची बेंटले फ्लाइंग स्पर W12 देखील या कारचा देखील समावेश आहे. योहान पूनावाला यांचा कारप्रती असणारा उत्साह आणि त्यांचा विलक्षण संग्रह हे भारतातील कार प्रेमींसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले जाते. फँटम VIII EWB ही शानदार कार बोहेमियन रेड कलरमध्ये तयार करण्यात आली आहे. या कारच्या इंटिरिअरमध्ये ड्युअल टोन फिनिशचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ही कार आणखी स्टायलिश लूकमध्ये दिसते.





